Pune Crime News :  पुणे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे ते इथे होत असलेल्या ड्रग्ज पार्ट्यांमुळे.   पुण्यातील FC रोडवर असलेल्या हॉटेलमध्ये ड्रग्ज पार्ट्या होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हॉटेलमधील बाथरूममध्ये ड्रग्जचे सेवन केले जात होते. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. पोर्शे कार अपघात प्रकरणानंतर  पुण्यातील अनेक बार तसेच हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली होती. मात्र, तरी देखील ड्रग्ज पार्टीचे प्रकरण उघडकीस आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यातील हॉटेल मध्ये सर्रास ड्रग्स विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.  पुणे शहरात शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरु असणाऱ्या पार्ट्यांमध्ये ड्रग्जचे सेवन केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील लिक्विड लिझर लाऊंज पबमधील व्हिडीओ व्हायरल झाला आहे.  या पार्टीमध्ये काही तरुण बाथरूम मध्ये ड्रग्ज घेताना आढळून आले. बाथरूममध्ये ड्रग्जचे सेवन केले जात असल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. तर, अनेक अल्पवयीन मुलांना दारू दिली जात असल्याचे समोर आले आहे. कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर आणखी एक प्रकार समोर आल्याने पुण्यातीव तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात अडकत चालल्याची चर्चा रंगली आहे. 


दरम्यान, उडता पंजाबच्या धर्तीवर उडता पुणे सुरू असल्याचा आरोप काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय.. तर या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी दिलेत..


पुणे ड्रग्ज विक्री प्रकरण उजेडात आल्यानंतर आता पोलीस कारवाईला वेग आलाय. फर्ग्युसन रोडवरील L3 बारमधील ड्रग्ज सेवन प्रकरणी पोलिसांच्या गुन्हे शाखेनं 5 जणांना ताब्यात घेतलंय. त्यामध्ये बार मालक मानस मलिक, बारचे 3 पार्टनर आणि मॅनेजर संतोष कामठे यांचाही समावेश आहे. रवी माहेश्वरी, योगेंद्र आणि शर्मा अशी अन्य तिघांची नावं आहेत. हा L 3 बार सील होण्याची शक्यता आहे.. तिथले सीसीटीव्ही आणि साऊंड सिस्टीम पोलिसांनी जप्त केलीय.. तर राज्य उत्पादन शुल्क विभागानं दारूसाठा जप्त केलाय..