शेतकऱ्यांकडून १ लाखांची लाच घेताना महावितरणाच्या तिघांना अटक
शेतातील विजेचा डीपी दुरुस्त करून बसविण्यासाठी शेतकऱ्यांकडून १ लाख रुपयांची लाच घेताना महावितरणच्या सहायक अभियंत्यासह २ जणांना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडून अटक केली आहे.
उस्मानाबाद : शेतातील विजेचा डीपी दुरुस्त करून बसविण्यासाठी शेतकऱ्यांकडून १ लाख रुपयांची लाच घेताना महावितरणच्या सहायक अभियंत्यासह २ जणांना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडून अटक केली आहे.
दीड लाख रुपयांच्या लाचेची मागणी
तुळजापूर तालुक्यातील होर्टी गावात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याच्या शेतातील बोअर वेल विजेचा डीपी नादुरुस्त असल्याने गेल्या ६ महिन्यापासून बंद आहे.हा डीपी दूरुस्त करण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दीड लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली.
महावितरणचा सहायक जाळ्यात
त्यानंतर पहिला १ लाख रुपये लाचेची हप्ता मुरूम मोड येथे घेताना महावितरणचा सहायक अभियंता सुधीर बुरनापल्ले , वरिष्ठ तंत्रज्ञ सरदार खान पठाण व खासगी इलेक्ट्रिकल गुत्तेदार पांडुरंग सिद्धराम जाधव या तिघांना अटक करण्यात आली.