Talathi Bharti: राज्यातील तलाठी भरतीची वाट पाहणाऱ्या हजारो तरुणांसाठी महत्वाची अपडेट आहे. विविध जिल्ह्यातील तलाठींची एकूण 4625 रिक्त पदे भरली जाणार आहेत. महाराष्ट्र शासनाकडून या भरतीसाठी  17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर    2023 दरम्यान परीक्षा घेण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून बारावी आणि ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण पूर्ण झालेले उमेदवार तलाठी भरतीसाठी अर्ज करु शकतात. यासोबतच मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयांचं चांगलं ज्ञान असणाऱ्या उमेदवारांना नोकरीत प्राधान्य मिळणार आहे. 


भूमी अभिलेख विभागाकडून  तलाठी भरती परीक्षा घेण्यात येणार असून लवकरच त्याची लिंक खुली करण्यात येणार आहे. 


महाराष्ट्रातील सहा विभागाअंतर्गत येणाऱ्या ३६ जिल्ह्यांतील चार हजार ६४४ पदांच्या भरती केली जाणार आहे. यामध्ये पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोकण, तसेच अमरावती या विभागांचा समावेश आहे.  सर्व जिल्ह्यातील तलाठ्यांची चार हजार ६४४ पदे भरली जातील. यासाठी लवकरच परीक्षा घेतली जाणार आहे. 


एकच प्रश्नपत्रिका 


महत्वाची अपडेट म्हणजे तलाठी भरती परीक्षेसाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका नसेल. राज्यातील सर्व जिल्हातून परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी एकच प्रश्नपत्रिका असणार आहे.


टीसीएसकडून होणार परीक्षा 


परीक्षेदरम्यान होणाऱ्या गैरव्यवहाराची मागील उदाहरणे पाहता महाराष्ट्र शासनाने महत्वाची पावले उचलली आहेत. त्यामुळे तलाठी भरती परीक्षा टीसीएस कंपनीच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. ही परीक्षा घेण्यासाठी टीसीएस कंपनीकडून १७ ऑगस्ट किंवा १२ सप्टेंबर या दोन तारखांचे पर्याय दिले आहेत. 


उमेदवारांचा प्रतिसाद


राज्यातील लाखो तरुण तलाठी भरती परीक्षेची तयारी करीत आहेत. त्यामुळे या परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणार आहे. सुमारे पाच लाख उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 


एकाच जिल्ह्यातून अर्ज


तलाठी भरती परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना एकाच जिल्ह्यातून अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यातून अर्ज भरल्यास ते बाद करण्यात येतील याची नोंद घ्या.


अर्ज शुल्क 


तलाठी भरतीसाठी अर्ज करणाऱ्या साधारण गटातील उमेदवारांना एक हजार, तर आरक्षित गटातील उमेदवारांना ९०० रुपये परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे. 


तलाठी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना राज्य शासनाकडून  वेळोवेळी जाहीर करण्यात आलेल्या सर्व अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे.