अलिबाग : Taliye village Landslide : रायगड जिल्ह्यातील महाड (Mahad) तालुक्यातील तळीये गावात (Taliye village) दरड कोसळून  (Landslide) झालेल्या दुर्घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले. वर्षभरात या गावातील दरडग्रस्तांचं पुर्नवसन पूर्ण करण्याचं आश्वासन तत्कालीन सरकारनं दिलं होते. प्रत्यक्षात मात्र आजही पीडित कुटुंब शासनानं दिलेल्या कंटेनरमध्येच जीवन जगत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सतत कोसळणाऱ्या पावसामुळे कोकणात अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या (Landslide) घटना घडल्या होत्या. त्यामधील सर्वात मोठी घटना महाडमध्ये घडली आहे. दरड कोसळून महाडमधील (Mahad) तळीये गाव (Taliye village) पूर्णत: डोंगर ढिगाऱ्यात गाढले गेले होते. 22 जुलैला दुपारी 12 वाजता पहिल्यांदा डोंगराचा काही भाग खाली आला. त्यावेळी काहींनी गाव सोडले आणि त्याचवेळी ग्रामस्थांना याची माहिती देत गाव सोडण्याची विनंती केली. दुपारी 4 वाजता वरच्या वाडी मागचा अक्खा डोंगर कोसळला आणि तळीये गाव डोंगराखाली गाढले गेले.  



जमिनी संपादीत करण्याकरिता वेळ लागल्याचे सरकारी कारण पुढे करून कासव गतीने काम सुरु असल्याने चिमुकले विद्यार्थी देखील याच कंटेनरमध्ये अभ्यासाचे धडे गिरवित आहेत. कोंडाळकर वाडीतील 66 घरं आणि 87 माणसं या दरडीखाली गाडली गेली. त्यापैकी 31 जणांचे मृतदेह शेवटपर्यंत हाती लागले नाहीत. वर्ष उलटलं तरी त्या आठवणी आजही अस्वस्थ करत आहेत.