योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पर्वतराजीचे अवैध उत्खनन रोखण्यासाठी टास्क फोर्सची निर्मिती नाशिकचे जिल्हाधिकारी करणार आहेत . यामध्ये पर्यावरण वादी पशू प्रेमी जैवविविधता तज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे . जलतज्ञ राजेंद्रसिंह यांनी त्र्यंबकेश्वर इथे गोदावरीचे उगमस्थान असलेल्या ब्रह्मगिरी पर्वताच्या मागील बाजूस अवैध उत्खननाबाबत गंभीर आक्षेप घेतल्याने झोपलेली यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाल्याचा प्रखर मुद्दा पर्यावरणवाद्यांनी मांडल्याने सध्या नाशिक जिल्ह्यातील अवैध उत्खननाचा प्रश्न आला आहे .


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निसर्गाची आणि पर्वतराजीची विपुल निसर्गसंपदा लाभलेल्या हा जिल्हा राज्यामध्ये अल्हाददायक वातावरण यासाठी प्रसिद्ध आहे . मात्र महसूल प्रशासनाच्या सतत होणाऱ्या दुर्लक्षामुळे निसर्ग सौंदर्य दिवसेंदिवस उजाड होऊ लागलय. जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या विविध प्रकारच्या विकासकामांसाठी दगड , माती , मुरूम , खडी इत्यादी गौण खनिजांची आवश्यकता भासते . जे गट जिल्हा खाणकाम योजनेमध्ये समाविष्ट केलेले आहेत , अशा गटांमधून इतर कायदेशीर बाबींची पूर्तता होत असल्यास उत्खननाची परवानगी दिली जाते .त्यामुळे निसर्ग संपदा आणि वातावरण सांभाळण्यास पूरक ठरणाऱ्या अनेक डोंगरांवर अवैध उत्खनन होत आहे.



जिल्हा प्रशासनाच्या आशीर्वादाने महसूल वाढीसाठी  अनेक महत्त्वपूर्ण डोंगरांना परवानगी देण्यात आल्याने नाशिक जिल्ह्यातील आणि शहराजवळील डोंगरमाथे उजाड होत आहेत आत्तापर्यंत शहरातील अनेक डोंगर भुईसपाट झाले आहेत.  अवैध उत्खननाबाबत जनतेच्या , तसेच पर्यावरण क्षेत्रात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते , तसेच संस्था यांच्याकडून अनेकदा तक्रारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त होत असतात . मात्र यावर गंभीरपणे लक्ष दिले जात नाही. 


भू माफिया आणि रेती माफियांच्या दबावामुळे मात्र ब्रह्मगिरीच उत्खनन झाल्यास गोदावरी खोरे उजाड होऊ शकते.  हा मुद्दा संवेदनशील होत असल्याने समन्वयातून यातून मार्ग काढण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्यात आलीये.  विकास कामांसाठी गौण खनिज आवश्यक असेल तरी पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील अशा डोंगररांगा , टेकड्या , जंगले , गड , किल्ले ठिकाणी उत्खनन होऊ न देता पर्यावरण संतुलन राखत समतोल व स्थायी विकास साधणे यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणेदेखील अपेक्षित आहे.


 ब्रह्मगिरी परिसरातील पाण्याचा प्रवाह वाढला तरी त्या काळात मराठवाड्याला भीषण पाणी संकटाचा सामना करावा लागू शकतो या परिसरातील सर्व डोंगर रांगा आता भू माफिया आमचे लक्ष्य बनले आहेत डोंगर पोखरून रेसोर्ट तयार करणे ब्रह्मगिरी वर हॉटेल तयार करण्याची तयारी सुरू आहे त्याला विरोध दर्शवण्यासाठी नाशिक जिल्ह्यातून पर्यावरणवाद्यांची फळी तयार झाली आहेयासाठी संपूर्ण राज्यातून जलतज्ज्ञांनी शासनावर दबाव आणणे गरजेचे आहे.