सिंधुदुर्ग : वेंगुर्ल्यातील जिल्हापरिषदेच्या शाळेत शिक्षकानंच विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. या प्रकरणी नराधम शिक्षकाला गावकऱ्यांनी चांगलाच चोप दिला. जयप्रकाश तेरसे असं या नराधम शिक्षकाचं नाव आहे.


पीडित विद्यार्थिनीला संगणक कक्षात बोलवून त्यानं तिच्याशी अश्लील चाळे केले.. या प्रकारानं घाबरलेल्या मुलीनं शिक्षकाच्या तावडीतून स्वताची सुटका करुन घर गाठलं.. पोलिसांत तक्रर केल्यानंतर जयप्रकाश तेरसेला अटक करण्यात आली असून त्याच्यावर 'बाल लैंगीक अत्याचार' कायद्या खाली गून्हा दाखल करण्यात आलाय.