नागपुरात गडकरी-फडणवीस यांच्या बालेकिल्ल्यात मोठा पराभव, काँग्रेसची सरशी
शिक्षक, पदवीधर मतदारसंघ निवडणूक (Teacher, Graduate Constituency Election) चारही जागांवर महाविकासआघाडीची (Maha Vikas Aaghadi)सरशी झाली आहे.
नागपूर : शिक्षक, पदवीधर मतदारसंघ निवडणूक (Teacher, Graduate Constituency Election) चारही जागांवर महाविकासआघाडीची (Maha Vikas Aaghadi)सरशी झाली आहे. औरंगाबादमध्ये आघाडीचे सतीश चव्हाण विजयी पुणे पदवीधरमध्ये आघाडीचे अरूण लाड विजयी झालेत. तर नागपुरात (Nagpur) भाजपला (BJP) पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. याठिकाणी आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसने बाजी मारली आहे. तर अमरावतीत अपक्ष उमेदवाराने बाजी मारली आहे. याठिकाणीही भाजपला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही.
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजपला राज्यात जोरदार धक्का बसलाय. नागपुरात नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या बालेकिल्ल्यातच मोठा पराभव पाहावा लागतोय. भाजपच्या संदीप जोशी यांचा पराभव झाला आहे. काँग्रेसच्या अभिजीत वंजारी यांचा विजय झाला आहे. भाजपनं पुणे पदवीधरचीही जागा गमावली. पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे अरूण लाड विजयी झालेत. त्यांनी भाजपच्या संग्राम देशमुखांचा पराभव केलाय. मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी विजयाची हॅटट्रीक केली आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार किरण सरनाईक आघाडीवर आहेत. याठिकाणी २३ व्या फेरीत नितीन धांडे बाद झालेत.
महाविकास आघाडीने विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात मिळवलेल्या भरघोस यशानंतर मुंबईत राष्ट्रवादीच्या कार्यालयात जल्लोष करण्यात आला. कार्यकर्त्यांनी ढोल ताशाच्या तालावर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवत ताल धरला. नागपूर पदवीधर मतदार संघातील काँग्रेसचे विजयी उमेदव अभिजीत वंजारी यांनी विजयाचे प्रमाणपत्र घ्यायला जाण्यापूर्वी गणेश टेकडी मंदिरात जाऊन दर्शन घेतल. नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाकडू संपूर्ण राज्याचं लक्ष होतं. तब्बल ५८ वर्षांनंतर काँग्रेसनं हा मतदारसंघ ताब्यात घेतलाय. अभिजित वंजारींनी सहकुटुंब गणेश टेकडी मंदिरात श्री गणेशाचे दर्शन घेतले.