बीडच्या शाळेत MMS कांड: एका शिक्षकाचे 3-3 शिक्षिकांसोबत अश्लील चाळे, Video Viral होताच…
बीडच्या नामांकित शाळेतील एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे. शाळेच्या आवारतच एक शिक्षक महिला शिक्षकांसह अश्लिल चाळे करत असल्याचा हा व्हिडिओ आहे. शाळेच्या मुख्याध्यापकाच्या तक्रारी वरून बीड शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाल आहे.
Beed Crime News : देवाच्या मंदिरांप्रमाणाचे शाळा देखील पवित्र स्थान मानले जाते. कारण, शाळांमध्ये विद्येचे ज्ञान दिले जाते. अशा ज्ञानदानाच्या मंदिरात धक्कादायक प्रकार घडला आहे. बीडमधील नामांकित शाळेच्या आवारातच शिक्षकांचे महिला शिक्षकांसह अश्लिल चाळे सुरु होते. या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणी बीड शरह पोलिस टाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बीडमध्ये एका नामांकित शाळेतील एका शिक्षकाने आपल्याच शाळेतील सहशिक्षक महिलांसोबत असभ्य वर्तणूक केल्याची बाब समोर आली होती. शाळेतील शिपायाने ही बाब मुख्याध्यापकांच्या कानावर घातली. ही सर्व माहिती मिळाल्यानंतर संबधित शिक्षकाला 22 नोव्हेंबर रोजी निलंबित देखील करण्यात आलं होते. मात्र, या नामांकित शाळेतील व्हिडिओ प्रकरण बीड जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय बनला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यध्यापकांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
या शाळेतील मुख्याध्यापकाने केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत अधिक तपास सुरू केलेला आहे. या तक्रारीत मुख्याध्यापकाने स्पष्टपणे सांगितलेला आहे की शाळेतील शिक्षकाने आपल्या शाळेतील महिला शिक्षकांसोबत असभ्य वर्तणूक करत असलेले शाळेच्या परिसरातले काही व्हिडिओ समोर आल्यानंतर संबंधित तीन महिला शिक्षकांवर देखील निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे.
या सर्व व्हिडिओ प्रकरणानंतर शाळेमध्ये दहशतीचा वातावरण आहे. पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचा वातावरण आहे. त्याचबरोबर यातले काही व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल जाले आहेत. त्यामुळे अनेक गैरसमज देखील पसरले आहेत. पालक विद्यार्थ्यांना शाळेत देखील पाठवत नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे.
हे व्हिडिओ करणारे आरोपी शिक्षक त्याचबरोबर हे व्हिडिओ वायरल करणारी जे कोणी आहेत त्यांच्या वरती कायदेशीर कार्यवाही करावी मागणी त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी पोलिसांकडे केलेली आहे. पोलिसांनी सदर घटनेची सर्व माहिती घेत गुन्हा दाखल केलेला आहे. या प्रकरणांमध्ये पोलीस अधिक तपास करत आहेत.
शाळेसारख्या पवित्र ज्ञान मंदिरामध्ये जर अशा गोष्टी घडत असतील शिक्षकांचीच व्हिडिओ जर आता समोर येत असतील तर, विद्यार्थ्यांनी काय धडे घ्यायचे असा सवाल देखील या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. मुख्याध्यापकांनी जरी या शिक्षक आणि सहशिक्षक का वरती कार्यवाही केलेली असली तरी मधील काही महिन्यापासून हे सर्व प्रकरण सुरू असताना मुख्याध्यापकांपर्यंत हा सर्व प्रकार का पोहोचला नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त होत. मात्र आता शाळेची होत असलेली बदनामी आणि विद्यार्थ्यांचे होत असलेलं नुकसा हे थांबावं यासाठी मुख्याध्यापकांनी उचललेलं पाऊल त्याला उशीर झाला असंच म्हणावं लागेल त्यामुळे पवित्र ज्ञान मंदिरात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रशासनाने देखील हे प्रकरण गांभीर्याने हाताळण्याची गरज आहे त्याचबरोबर पोलिसांनी देखील योग्य पद्धतीने पोलीस तपास करणे गरजेच आहे.
झी 24 तासला मिळालेल्या माहितीनुसार मागील अनेक दिवसापासून हा सर्व प्रकार बीडमध्ये चर्चेचा विषय बनला होता. मात्र, या प्रकरणात कोणीही तक्रार द्यायला तयार नव्हतं एका शिक्षकाने केलेल्या कृत्यामुळे नाहक पूर्ण शाळेसह अनेक सहशिक्षक महिला देखील बदनाम होत आहेत. तर, या प्रकरणानंतर अनेक सहशिक्षक महिलांचे संसार उध्वस्त झाले आहेत.