नागपूर : कोल्हापुरातील चंदगडच्या शिक्षा देणाऱ्या मुख्यध्यापिकेचं वेतन रोखण्याचे आदेश शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिलेत. ५०० उठा बशांच्या शिक्षेनंतर विद्यार्थिनीवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. हा मुद्दा विधानसभेत गाजला. त्यानंतर तावडे यांनी हे आदेश दिलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापूरमध्ये विद्यार्थिनीला ५००  उठा बशा काढण्याची शिक्षा मुख्याध्यापिकेने दिली. त्यानंतर संबंधित विद्यार्थीनीने ३०० उठाबशा काढल्या. 


चंदगडमधल्या कानूर बुद्रूक इथल्या भावेश्वरी संदेश विध्यालयातल्या मुख्याध्यापिका अश्विनी देवणे यांनी आठवीत शिकणा-या विजया चौगुलेला पाचशे उठाबशा काढण्याची शिक्षा दिली होती. तीनशे उठाबशा काढल्यानंतर तिची प्रकृती ढासळली.


तिच्यावर कोल्हापुरातल्या सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलीला मोठा मानसीक धक्का बसल्यामुळे छत्रपती प्रमीलाराजे रुग्णालयाचे डीन यांनी सांगितलंय.