विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव​ : ज्ञानाचे धडे देणा-या शिक्षकाकडूनच १४ अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचाराची घटना जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आरोपी मुख्याध्यापकाला पोलिसांनी अटक केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बोहर्डी गावातल्या जिल्हा परिषद शाळेतल्या गणेश चुडामण कोलते या अट्ठेचाळीस वर्षीय मुख्याध्यापकानं चौदा विद्यार्थिनींवर अत्याचार केला. पीडित मुलीनं घरी हा प्रकार सांगितल्यानंतर हे प्रकरण उघड झालं. 


मुख्याध्यापक गणेश कोलते आपल्या कार्यालयात विद्यार्थिनींना बोलवायचा. नापास करायची धमकी देत मोबाईलवर अश्लिल व्हीडीओ दाखवून त्यानं अत्याचार केल्याचं समोर आलंय. या प्रकरणी वरणगाव पोलिसांनी कोलतेला अटक केली आहे.  


दरम्यान, पीडित मुलींना वैद्यकीय तपासणीसाठी जळगाव जिल्हा सरकारी रुग्णालयात ताटकळत बसावं लागल्याचं समोर आलंय. त्यामुळे पीडित मुलींच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केलाय.