बारावीच्या परीक्षा सुरू पण पेपर तपासणार कोण?
बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरु झालीय. पण कनिष्ठ महाविद्यालयातल्या प्राध्यापकांचा उत्तरपत्रिका तपासणीवरचा बहिष्कार कायम आहे.
मुंबई : बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरु झालीय. पण कनिष्ठ महाविद्यालयातल्या प्राध्यापकांचा उत्तरपत्रिका तपासणीवरचा बहिष्कार कायम आहे.
त्यामुळं ८० लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून आहेत. प्राध्यापकांच्या मागण्या सरकारनं पूर्णपणे मान्य न केल्यानं प्राध्यपकांचं बहिष्कार आंदोलन कायम राहणार आहे.
शिक्षण मंत्र्यांबरोबर महासंघाची चर्चा झाली. काही मागण्यांचे शासनादेश काढण्यात आले आहेत. इतर महत्त्वाच्या मागण्यांबाबत चर्चा सुरू आहे.
अंतिम निर्णय होईपर्यंत 'उत्तरपत्रिका तापसणीवरील बहिष्कार कायम राहील, असा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेन पवित्रा घेतलाय. बारावीचा निकाल वेळेवर लागला नाहीतर त्याला शासन जबाबदार असेल, मुख्यमंत्र्यांनीही यामध्ये हस्तक्षेप करावा, अशी मागणी शिक्षक संघटनेनं केलीय.