पुणे : 'समान काम समान वेतन' च्या मागणीसाठी पुण्यातील हंगामी शिक्षकांनी महापालिकेवर मोर्चा काढला. यावेळी शिक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे महापालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांवर हे शिक्षक कार्यरत आहेत. शहरात महापालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या ५० शाळा आहेत. सुमारे १८००० विद्यार्थी तिथे शिकतात. मात्र शाळांमध्ये शिक्षकांची संख्या अपुरी आहे. 


नवीन भरती करताना जुन्या शिक्षाकांना डावलण्यात येत आहे. त्याचप्रमाणे हंगामी शिक्षकांना फक्त ६००० रुपये पगार आहे. त्यामुळे शिक्षकांवर कुटुंब चालवताना मोठा प्रश्न पडलाय. या सगळ्याच्या विरोधात हंगामी शिक्षकांनी आंदोलनाचा मार्ग पत्करला आणि मोर्चा आंदोलन केले.