आकोला : आवडत्या पदार्थांचं नावं ऐकलं तर ते खाण्याचा मोह वारंवार टाळणं शक्य नसतं. अशातच तो पदार्थ पाणीपूरी असेल तर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


भारतामध्ये अनेक ठिकाणी पाणी पुरी वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते. वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. महाराष्ट्रातही पाणीपुरी हे हमखास आवडीचं  स्ट्रीट फूड आहे. पण पाणीपूरी  खाण्याचा शौक नियमित पूर्ण करण्यासाठी एका मुलाने केलेला प्रकार ऐकून तुम्हीही थक्क व्हाल... 


पाणीपुरीसाठी चोरी 


अकोल्यातील   अकोटमध्ये राहणारा आणि दहावीत असलेला एक मुलगा पाणीपुरी खाण्यासाठी चक्क सायकल चोरी करायचा हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 


दिवसाला 50 पाणीपुरी  


दिवसाला 50 पाणीपुरी खाण्याचा छंद जडलेल्या एका मुलाने मित्रांसोबत नेहमी पाणीपुरी खायला मिळावी याकरिता सायकल चोरल्याचा भन्नाट प्रकार समोर आला आहे. 


शाळा,कॉलेज,क्लास या परिसरातून या मुलाने तब्बल 8 सायकली चोरल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पाणीपुरी खाण्यासाठी आपला मुलगा अशाप्रकारची चोरी करत असल्याचे त्याच्या कुटुंबीयांना ठाऊकही नव्हते.