KCR Dinner controversy: तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचे महाराष्ट्रात औक्षण करुन स्वागत करण्यात आले आहे. धाराशिवमध्ये मटणावर ताव मारुन 600 गाड्यांच्या ताफ्यासह केसीआर सोलापूरकडे रवाना झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव मंत्रिमंडळासह आज संध्याकाळी सोलापुरात दाखल होणार आहेत. दरम्यान केसीआर यांच्यासाठी मटणाचा बेत आखल्याने अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनीदेखील ट्विट करुन टिका केली आहे. 


मुख्यमंत्री केसीआर, मंत्री, खासदार आणि आमदार असे 600 गाड्यांचा ताफा घेऊन सोलापुरात दाखल होतील. त्यानंतर केसीआर उद्या मंत्रिमंडळासह विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेणार आहेत.


दरम्यान अमोल मिटकरी यांनी केसीआर यांच्यावर मटणाच्या बेतावरुन निशाणा साधला आहे. मटनाचा शाही बेत! पंढरी वारिवर असताना मुख्यमंत्री केसीआर हा प्रकार शोभतो का ?  असा प्रश्न उपस्थित केला आहे.



वारकऱ्यांच्या भावनाशी खेळू नका ? पंढरपूर येताना 10 हजार वेळा विचार करा.पंढरीची वारी पवित्र आहे आपल्या अश्या वागण्याने अपवित्र करू नका, असे आवाहन अमोल मिटकरी यांनी केले आहे. 


दरम्यान, राज्यात शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन काही वेगळं चित्रं निर्माण करू शकतो का? असा के चंद्रशेखर राव यांचा प्रयत्न असल्याचा टोला पवारांनी मारला. काही लोकांनी इथून कांदा हैदराबादला नेला आणि त्यांची फजिती झाली असंदेखील पवार म्हणाले.