जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर : गेल्या काही दिवसांपासून नागपुरात ४६ अंशावर असलेला पाऱ्याने आज ४७ अंशाचा टप्पा ओलांडला. आज नागपुरात ४७.५ अंश सेल्सियस एवढ्या तापमानाची नोंद करण्यात आली. गेल्या सहा वर्षातील हे सर्वाधिक कमाल तापमान आहे. यापूर्वी २३ मे २०१३ साली ४७.९ एवढे कमाल तापमान नोंदविण्यात आले होते. तर ३० एप्रिल २००९ साली ४७.१ अंश सेल्सियस एवढ्या तापमानाची नोंद करण्यात आली होती. मे महिना सुरु झाल्यापासून सातत्याने तापमानात वाढ होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागील आठवड्यापासून उष्णतेत प्रचंड वाढ झाली असून तापमान हे सतत ४५ अंशाच्या वर नोंदविण्यात आले आहे. हवामान खात्यातर्फे रेड अलर्ट जारी करण्यात आला असून येत्या आठवड्यापर्यंत उष्णता कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.


२१ मे २०१९ पासून ते आजपर्यंतचे (२८ मे) नागपूरचे तापमान 


२१ मे  -- ४५.६ 
२२ मे -- ४६.० 
२३ मे -- ४६.०२ 
२४ मे -- ४६. ० 
२५ मे -- ४६.३ 
२६ मे -- ४६.५ 
२७ मे -- ४६.७ 
२८ मे -- ४७.५