मुंबई : राज्यात येत्या काही दिवसांत थंडी वाढणार असून मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या काही भागांत पारा सरासरीपेक्षा खाली जाण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुलाबा वेधशाळेनं हा अंदाज वर्तवला आहे. उत्तर भारतातून थंड हवा महाराष्ट्राच्या दिशेनं येत आहे. त्यामुळे थंडी जास्त पडत असल्याचं कुलाबा वेधशाळेनं सांगितलं आहे. दरम्यान रविवारी राज्यात नाशिकमध्ये ८ अंश, जळगावमध्ये ५.२ अंश तर गोंदियामध्ये ८.४ अंश तापमानाची नोंद करण्यात आली.