मुंबई : 'देव भक्तीचा भुकेला...' असे जरी म्हटले जात असले तरी देवळात जाताना भाविक फुलं, नारळ, हार, पेढे असं बरंच काही घेऊन जातात. त्यामुळे देव प्रसन्न होतो, अशी भाविकांची श्रद्धा असते. पण मुंबईतील चेंबूरमध्ये एक छोटेसे मंदिर आहे तिथे मात्र देवाला प्रसन्न करण्याचा मार्ग वेगळा आहे. हे मंदिर आहे बाबा भैरोनाथ यांचे. जिथे देवाला प्रसन्न करण्यासाठी चक्क दारू चढवली जाते. यावर अनेक भाविकांची श्रद्धा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे श्रद्धाळू भाविक दरवर्षी ‘कार्तिक एकादशी’ची आवर्जून वाट बघतात. कारण त्यादिवशी देवाला व्हिस्की, रम, व्होडका किंवा इतर अन्य प्रकारची दारू चढवतात. या मंदिराची स्थापना जवळपास चार दशकांपूर्वी झाली होती. विशेष म्हणजे हे मंदिर स्मशानाजवळ आहे. 


हिंदू पंचांगानुसार कार्तिक एकादशीच्या दिवशी या मंदिरात भाविक मोठ्या संख्येने येतात. दारू देवाला चढवल्यानंतर श्रद्धाळू भाविक प्रसाद म्हणून दारू ग्रहण करतात. भैरोनाथ यांना भगवान शंकराचा अवतार मानले जाते. जलयस मंदिराची देखभाल करणाऱ्या रमेश लोहाना यांनी सांगितले की, "कार्तिकी एकादशी आमच्यासाठी अत्यंत शुभ दिवस असतो. या दिवसाची आम्ही सगळे आतुरतेने वाट बघतो. सगळ्या धर्मातील हजारो भाविक येथे येतात आणि देवाला दारू चढवतात. ही परंपरा ४० वर्षांपासूनची आहे."