ज्ञानेश्वर पतंगे / धाराशिव : Terna Sugar Factory:  तेरणा साखर कारखाना कोणाकडे राहणार याचा वाद आता निकाली निघाला आहे. (Maharashtra Political News) काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री अमित देशमुख ( Amit Deshmukh) यांची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. यामुळे आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant ) यांना मोठा दिलासा आहे. आता हा कारखाना तानाजी सावंत यांच्या ताब्यात गेला आहे.


धाराशिव जिल्ह्यात राजकीय शक्ती वाढण्यास मदत 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 अमित देशमुख आणि आरोग्य मंत्री सावंत यांच्यात तेरणा कारखान्यावरुन न्यायालयीन वाद सुरु होता. यात सावंत यांनी बाजी मारली आहे. त्यामुळे मंत्री सावंत यांची धाराशिव जिल्ह्यात राजकीय शक्ती वाढण्यास मदत होणार आहे. अमित देशमुख यांच्या 20-20 साखर कारखान्याची याचिका न्यायालयाने  फेटाळली  असल्याने हा देशमुख यांच्यासाठी मोठा झटका आहे.


ढोकी येथील तेरणा साखर कारखाना सावंतांकडे


धाराशिव- मागील वर्षभरापासून राज्याचे आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत आणि माजी मंत्री अमित देशमुख यांच्यात धाराशिव जिल्ह्यातील तेरणा सहकारी साखर कारखान्यावरुन न्यायालयीन लढाई सुरु होती. धाराशिव जिल्ह्यातील ढोकी येथील तेरणा साखर कारखाना मंत्री सावंत यांच्या भैरवनाथ साखर उद्योग समूहाला भाडेतत्वावर देण्याचे DRAT न्यायालयाने आदेश दिले आहेत. 


25 वर्षांसाठी साखर कारखाना भाडेतत्वावर देण्याचा मार्ग मोकळा


धाराशिव जिल्हा बँकेने टेंडर प्रक्रिया राबवलेली ती योग्य असल्याचे आदेश दिले आहेत. माजी मंत्री अमित देशमुख यांच्या ट्वेंटीवन शुगर उद्योग समूहाने सावंत यांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती याचिका अखेर न्यायालयाने फेटाळली आहे. या निर्णयाने भैरवनाथ समूहाला आगामी 25 वर्षांसाठी तेरणा कारखाना भाडेतत्वावर देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 


नोव्हेंबर 2021 मध्ये जिल्हा बँकेने तेरणा कारखाना भाडेतत्वावर देण्याची कारवाई झाली होती मात्र माजी मंत्री अमित देशमुख यांच्या समूहाने न्यायालयात याचिका दाखल केली होती. तब्बल एक वर्षाच्या न्यायलयीन लढाईनंतर तेरणा कारखाना भैरवनाथ उद्योग समूहाला मिळणार आहे. तेरणा कारखाना हा धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. या निर्णयामुळे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची धाराशिव जिल्ह्यातील राजकीय शक्ती वाढणार आहे.


तेरणा शेतकरी सहकारी कारखान्याची 105 हेक्टर 41 आर इतकी जमीन आहे. पाच हजार मेट्रीक टन इतकी गाळप क्षमता आणि देशी दारुचे उत्पादन तसेच वीज निर्मीतीचा 14 मेगावॅटचा प्रकल्प यामध्ये अंतर्भूत आहे. यामध्ये भाडेतत्वावर देताना हा कारखाना 25 वर्ष करारावर देण्यात येणार आहे.