पुणे : Women were burnt by throwing petrol in Pune: कामावरुन काढून टाकल्याच्या रागातून कामगाराने लेडिज टेलरींगचे दुकान पेटवून दिले. या दुकानात पेट्रोल ओतून लायटरने महिलेसह दुकान पेटवून दिले. ही घटना सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेत दोघांचाही मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या महिलेला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आरोपीचा मित्र गंभीर जखमी झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्याला कामावरुन काढून टाकले. याचा मनात राग पकडून कामगाराने लेडिज टेलरींगचे दुकान चालवणाऱ्या महिलेला पेट्रोल ओतून लायटरने पेटवून दिले. या घटनेत दुकान चालवणारी महिलाचा मृत्यू झाला. महिलेला जाळण्याचा प्रयत्न करत असताना आरोपी देखील होरपळल्याने गंभीर जखमी झाला. रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.


महिलेला वाचवण्यासाठी मदतीला धावलेला आरोपीचा मित्र देखील गंभीर जखमी  झाला असून या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी आरोपीवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल  झाला आहे. एटी टू झेड लेडिज टेलरींगचे दुकान चालवणाऱ्या बाला नोया जॉर्नी ही महिला वडगाव शेरी येथे राहत होती. दुकानात काम करणारा कामगार मिलिंद गोविंदराव नाथसागर याने कामावरुन काढून टाकल्याच्या रागातून महिलेवर पेट्रोल ओतल्याचे समोर आले आहे.