पुणे : TET परीक्षा घोटाळ्याचा सूत्रधार तुकाराम सुपे याच्या मित्राकडून 5 लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. तर आता जीए. कंपनीचा माजी संचालक अश्विन कुमार याच्या घरातून 25 किलो चांदी, 2 किलो सोने आणि हिरे जप्त करण्यात आले आहे. यावरुन हा TET परीक्षा घोटाळा किती मोठा आहे, याचा अंदाज येऊ शकतो. तुकाराम सुपेकडून आजवर हस्तगत करण्यात आलेल्या घबाडाची रक्कम 3 कोटी 93 लाखांपर्यंत पोहोचली आहे. इतकंच नाही तर आणखी काही रक्कम असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीईटी पेपरफुटी प्रकरणी अश्विन कुमारला अटक करण्यात आली आहे. जीए सॉफ्टवेअर कंपनीचा माजी संचालक अश्विन कुमारच्या बंगळुरूच्या घरातून तब्बल 25 किलो चांदी, 2 किलो सोनं, हिरे जप्त करण्यात आले आहेत. अश्विनकुमार हा प्रीतिश देशमुख बरोबर काम करत होता. 


तुकाराम सुपे याच्या घरी पुन्हा सापडले घबाड, कितीही रोकड 


प्रीतिशकडे केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आजी-माजी आयुक्तांना या प्रकरणात अटक करण्यात आली. त्यानंतर याचे धागेदोरे थेट बंगलोर येथील अश्विनकुमारपर्यंत जाऊन पोहोचले होते. काही दिवसांपूर्वीच त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांचे एक पथक शुक्रवारी त्याच्या बंगलोर येथील निवासस्थानी पोहोचले. या ठिकाणी छापेमारी करत पोलिसांनी हिरे, सोनं, चांदी असा लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.



TET गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी आणि परीक्षा परिषेदेचा निलंबित आयुक्त तुकाराम सुपे आणि अभिषेक सावरीकर यांनी जी. ए. सॉफ्टवेअरचा संचालक डॉ. प्रीतिश देशमुख यांच्याशी हातमिळवणी केली. त्यांनी बनावट वेबसाईट तयार करून अपात्र उमेदवारांचे निकाल जाहीर करत पैसे उकळले, अशी माहिती न्यायालयाला देण्यात आली.न्यायालयाने दोघांची पोलीस कोठडी 30 डिसेंबरपर्यंत वाढवली. 


तुकाराम सुपेचे घबाड संपता संपेना !


- 17 डिसेंबर, 2021
- 88 लाख 49 हजार 570 रोकड
- 5 तोळे सोने
- 5 लाख 50 हजारांचे फिक्स डिपॉझिट


- 19 डिसेंबर, 2021
- 1 कोटी 58 लाख रोकड
- दीड किलो सोने


- 22 डिसेंबर, 2021
10 लाखांची रोकड


- 23 डिसेंबर, 2021
24 लाख रोकड


- 24 डिसेंबर, 2021
33 लाख रोकड


- 25 डिसेंबर, 2021
- 5 लाख रुपयांची रोकड


- एकूण हस्तगत ऐवज
3 कोटी 93 लाख