पुणे : MAHA TET Exam : टीईटी गैरव्यवहार प्रकरणी आता मोठी कारवाई होणार आहे. बनावट प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळवलेल्यांचा शोध घेण्यात येणार आहे. टीईटी परीक्षेत (TET exam) गैरव्यवहार उघडकीस आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता शिक्षकांच्या 'टीईटी' प्रमाणपत्राची पडताळणी होणार आहे. राज्य परीक्षा परिषदेचे शिक्षण उपसंचालक यांनी तसे शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. यामुळे आता बोगस शिक्षकांचा पर्दाफाश होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात 13 फेब्रुवारी 2013 नंतर नियुक्त झालेल्या पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीच्या शिक्षकांच्या TET उत्तीर्ण प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. 



TET परीक्षेत गैरव्यवहार झाल्याची माहिती पुढे आली होती. तसेच हा गैरव्यवहार उघड झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे पडताळणीतून बनावट प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळवलेल्या शिक्षकांचा शोध लागण्याची शक्यता आहे. सध्या सहाशे प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचे काम सुरू आहे. उर्वरित शिक्षकांच्या प्रमाणपत्राची पडताळणी आता करण्यात येईल. त्यामुळे बोगस प्रमाणपत्राच्या माध्यमातून नोकरी मिळवल्यांच्या नोकरीवर गदा येणार आहे.