मुंबई : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्यकाळात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राबविलेल्या सुमारे ४९ कोटी वृक्षलागवड मोहिमेच्या चौकशीचे आदेश वनमंत्री संजय राठोड यांनी दिले आहेत. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार आणि काही आमदारांनी लेखी तक्रारी केल्यानंतर याबाबत चौकशीचा निर्णय घेण्यात आल्याचं राठोड यांनी म्हटलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वनमंत्र्यांच्या या आदेशानंतर चौकशी करण्यासाठी न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली चौकशी समितीच नेमा असं आव्हान सुधीर मुनगंटीवार यांनी दिलंय. शंकेखोरांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी श्वेतपत्रिका काढा असंही मुनगंटीवार यांनी म्हटलंय. 


नागपुरातील मध्यवर्ती नियंत्रण कक्षात यासंबंधीची संपूर्ण आकडेवारी उपलब्ध असल्याचही त्यांनी स्पष्ट केलंय. वनविभाग हे काम मनरेगा अथवा रोहयोच्या माध्यमातून पूर्ण करत. त्यासाठी मुंबई महापालिकेसारखे एखादे टेंडर काढत नाही असा टोलाही मुनगंटीवार यांनी लगावला आहे. 



दरम्यान, कुणाला चौकशी करायची ती करा, असं आव्हान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही दिलं.