ठाकरे गटाच्या नेत्याची दाऊदच्या हस्तकाबरोबर पार्टी, नितेश राणे यांनी विधानसभेत दाखवले फोटो
Maharashtra Politics : ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजरचे दाऊशी संबंध असल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. नितेश राणे यांनी विधनसभेत फोटो पार्टीचे फोटो दाखवले. यानंतर पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले असून बडगुजर यांचा कार्यकर्ता पवन मटाले याला ताब्यात घेण्यात आलं आहे.
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणातील आताची मोठी बातमी. ठाकरे गटाचे (Thackeray Group) नेते मुंबईत झालेल्या 1993 च्या बॉम्बस्फोटातल्या आरोपींसोबत असल्याचे फोटोच नितेश राणेंनी (Nitesh Rane) विधानसभेत दाखवले.. बॉम्बस्फोटातला प्रमुख आरोपी सलीम कुत्ता (Salim Kutta) हा ठाकरे गटाचे नाशिक शहरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांच्यासोबत पार्टी करत होता असा आरोप नितेश राणेंनी केला.. सुधाकर बडगुजर यांचा राजकीय गॉडफादर कोण आहे. बडगुजर कोणाच्या संपर्कात असतात याची चौकशी करण्याची मागणी नितेश राणेंनी विधानसभेत केली. बडगुजरा हा संजय राऊत यांचा चेला असल्याचंही नितेश राणे यांनी म्हटलंय.
आम्ही ट्रेलर देण्याचं काम केलं आहे. आता सखोल चौकशी केली जावी असं सांगत नितेश राणे यांनी पार्टी मातोश्रीमध्येप पण होती का? असा सवाल उपस्थित केला आहे. सुधाकर बडगुजरला तातडीने अटक करावं, तो बाहेर राहिल्यास पुरावे नष्ट करेल अशी मागणीही नितेश राणे यांनी केली आहे. नितेश राणेंनी विधानसभेत केलेल्या आरोपांची एसआयटी चौकशी केली जाईल अशी घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीय.. देशद्रोह्यांसोबत पार्टी झोडल्याचा आरोप नितेश राणेंनी केलाय. सुधाकर बडगुजर हे शिवसेना ठाकरे गटाचे नाशिकमधील महागनर प्रमुख आहेत.
सुधाकर बडगुजर आणि मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहीम याचा उजवा हात समजला जाणारा सलीम कुत्ता एकत्र पार्टी करत असल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या पक्षाकडून यांना संरक्षण कसं दिलं जातं, असा सवालही नितेश राणे यांनी उपस्थित केला. दरम्यान, नितेश राणेंनी विधानसभेत केलेल्या आरोपांची एसआयटी चौकशी केली जाईल अशी घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. मंत्री दादा भुसे यांनीही देशद्रोहासोबत डान्स पार्टी करणाऱ्यांना वाचवणारी राजकीय शक्ती कोण आहे? सुधाकर बडगुजरचे लागेबांधे कोणाशी आहेत? या प्रकरणातील मुख्य आरोपीलाही अटक करावी अशी मागणी केली.
पोलीस अॅक्शनमोडवर
नाशिकचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा विधिमंडळात नितेश राणे यांनी व्हिडिओ दाखवल्यानंतर नाशिकची क्राईम ब्रँच ऍक्टिव्ह झाली आहे. कुख्यात गुन्हेगार दाऊदच्या कार्यकर्त्यांबरोबर बडगुजर नृत्य करत असल्याने त्यांचे संबंध देश विघातक कारवाया करणाऱ्या लोकांसोबत असल्याचं समोर आल आहे. पोलिसांनी बडगुजर यांच्या कार्यालयातील त्यांचा कार्यकर्ता पवन मटाले याला ताब्यात घेतले आहे बडगुजर हे शहर बाहेर असून दुपारी दोन वाजेपर्यंत शहरात पोहोचणार आहेत त्यानंतर प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत.