Uddhav Thackeray : ठाकरे गटाचे आता पुन्हा `मिशन महाराष्ट्र`, पक्ष नव्याने उभारण्यासाठी `ही` रणनिती
Uddhav Thackeray : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आजपासून आठवडाभर शिवसंवाद अभियान सुरु झाले आहे. पक्षाचे प्रमुख नेत्यांसह, महिला आघाडी आणि युवा सेनेचे पदाधिकारी राज्याच्या विविध भागात दौरा करणार आहेत. पक्षाची पडझड रोखून संघटना बळकट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत.
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणातील बातमी. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गट अधिक जोमाने कामाला लागला आहे. (Uddhav Thackeray) पक्षाचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला निवडणूक आयोगाने बहाल केल्यानंतर आता ठाकरे गट अधिक आक्रमक झाला असून आता ठाकरे यांच्या शिवसंवाद अभियानाला सुरुवात झालेय. (Maharashtra Politics News in Marathi) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आपली नव्याने व्युहरचना आखत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हे अभियान राबविण्यात येत आहे. (Maharashtra Politics News)
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आजपासून आठवडाभर शिवसंवाद अभियान सुसुरु झाले आहे. 25 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान हे अभियान सुरु राहणार आहे. पक्षाचे प्रमुख नेत्यांसह, महिला आघाडी आणि युवा सेनेचे पदाधिकारी राज्याच्या विविध भागात दौरा करणार आहेत. पक्षाची पडझड रोखून संघटना बळकट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत.
चिन्हासह पक्षही निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या ताब्यात दिल्यानंतर स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न या अभियानाद्वारे केला जाणार आहे. जिल्हावार पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठका घेवून शाखांची माहिती, पदाधिकाऱ्यांची रिक्त पदे, स्थानिक प्रश्नांची माहिती घेतली जाणार आहे.
दरम्यान, देशभरातले प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी काल मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावर राऊत बोलत होते.