ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना नागपूर पोलिसांनी घेतले ताब्यात
Nitin Deshmukh : आमदार नितीन देशमुखांना नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी खारपान पट्ट्यातील क्षारयुक्त पाणी टँकरने घेऊन जात असताना देशमुख यांना धामणा परिसरात अडवण्यात आले.
Nitin Deshmukh : ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांना नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी खारपान पट्ट्यातील क्षारयुक्त पाणी टँकरने घेऊन जात असताना देशमुख यांना धामणा परिसरात अडवण्यात आले. दरम्यान, पाणीप्रश्नावर अकोला ते नागपूर यात्रा काढणाऱ्या आमदार नितीन देशमुख यां अटक झाली आहे. नागपूरच्या हद्दीबाहेर पोलिसांनी रोखले आणि अटक केली. हे सरकार जनतेलाच घाबरु लागले, असे खासदार संजय राऊत यांनी ट्विट केले आहे.
नितीन देशमुख यांच्या 'जल यात्रे'ला नागपूर पोलिसांनी परवानगी नाकारली होती. असे असतानाही यात्रा काढण्यात आली. मात्र, आता देशमुखांना ताब्यात घेण्यात आले आहे. अकोल्यातील बाळापूर विधानसभा मतदार संघामधील 69 खेडी योजनेवरील स्थगिती उठवण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यासाठी नितीन देशमुख यांनी आपल्या समर्थकांसोबत अकोला ते नागपूर पायदळ यात्रा काढली. खारपान पट्ट्यातील खारं पाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आंघोळ घालण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली होती. देशमुखांना आता ताब्यात घेतल्यानं राऊतांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
पाणी प्रश्नावर अकोला ते नागपूर यात्रा काढणाऱ्या आमदार नितीन देशमुखना अटक झाली. नागपूरच्या हद्दीबाहेर पोलिसांनी रोखले. खारघर येथे श्रीसेवक पाण्याशिवाय तडफडून मारले. आता विदर्भात पाणी पाणी आक्रोश केला म्हणून अटक केली जात आहे. महाराष्ट्र जणू मोगलाई अवतरली, सरकार जनतेलाच घाबरु लागले आहे, असा निशाणा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर साधला आहे.
का काढण्यात आली जल आक्रोश यात्रा?
बाळापूर आणि अकाेला तालुक्यातील खारपाणपट्यातील गावांसाठी अणाऱ्या 69 गाव प्रादेशिक पाणी पुरवठा याेजनेला सरकारने स्थगिती दिली आहे. याच्या विरोधात ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष यात्रेला सुरुवात करण्यात आली. दरम्यान, त्यांची ही यात्रा नागपूर येथे रोखण्यात आली आहे. नितीन देशमुख जल संघर्ष यात्रा घेऊन नागपूरच्या सीमेवर दाखल झाले आहेत. मात्र पोलिसांनी त्यांची संघर्ष यात्रा मध्येच अडवली आहे. दरम्यान, दत्तवाडी परिसरात मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले आहेत. त्याचवेळी राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्याही बोलावण्यात आल्या आहेत.