Ravindra Waikar : ठाकरे गटाचे नेते आणि आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत वायकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला.  ईडी चौकशी सुरू झाल्यानंतर वायकर पक्ष सोडणार अशा चर्चा अनेक दिवसांपासून रंगत होत्या. जोगेश्वरीतला राखीव भूखंड अपहार प्रकरण आणि रायगडमधल्या बेहिशोबी मालमत्तेमुळे वायकर ईडीच्या रडारवर आले आहेत. रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जात आहे. 


उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही - भास्कर जाधव


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, भास्कर जाधव शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रगंली होती. उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही असं भास्कर जाधवांनी स्पष्ट केले आहे. माझ्या शिवसेनेवर आणि माझ्या पक्षप्रमुखांवर अन्याय झालाय त्यासाठी मी लढतोय. 2024 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत मी तुमची साथ सोडणार नाही असं जाधवांनी म्हटलंय. शिवसेनेमध्ये माझ्या अनेक संधी हुकल्या. मात्र, मी नाराज नाही. मी पदासाठी कधीही संघर्ष केला नाही असं ठामपणे सांगत माझ्या पत्राचा विपर्यास केला गेल्याची खंत व्यक्त केली. यावेळी भास्कर जाधव भावनिक झाले.


भास्कर जाधव यांना शिंदे गटाची खुली ऑफर


उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत नाराज असलेल्या भास्कर जाधव यांना एकनाथ शिंदे गटानं खुली ऑफर दिलीये.. भास्कर जाधव यांची उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत घुसमट होत असेल तर त्यांनी आमच्याकडे यावं.. एकनाथ शिंदे त्यांना न्याय देतील असं आवाहन आमदार भरत गोगावलेंनी केलंय..