Omraje Nimbalkar 0n Eknath Shinde's Rebellion  : राज्यात शिवसेनेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केले. त्यानंतर त्यांच्यासोबत 39 आमदार सहभागी झाले. (Shiv Sena Crisis) शिवसेनेतून 40 आमदार फुटल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. मात्र, शिंदे यांच्या बंडाची कुणालाच काही माहिती कशी लागली नाही, याचीही चर्चा होती. ( Political News)) मात्र, आता ठाकरे गटातील (Uddhav Thackeray) नेत्याने शिंदे यांच्या बंडाची कुणकुण लागली होती, असा गौप्यस्फोट केला आहे. (Maharashtra Political News) धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात निंबाळकर घराण्याचा दबदबा आहे. ओमराजे निंबाळकर हे सातत्याने चर्चेत असतात. त्यांचा बेधडक स्वभाव आणि त्यांची लोकप्रियता हा कायमच चर्चेचा विषय असतो.  आता त्यांनी असेच एक धक्कादायक विधान केले आहे. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकनाथ शिंदे यांच्या बंडाची कुणकुण लागली होती, अशी माहिती खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी दिला आहे. व्हाट्सअपवर एसएमएस येत होते,असे सांगत मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे इशारा केला आहे. दरम्यान, याआधी पुरंदरचे विजय शिवतारे यांनीही आपणच शिंदे यांना बंड करण्यास भाग पाडल्याचा दावा केला आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याकडून शिवसेनेचे खच्चीकरण होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यांच्यासोबत जाण्यापेक्षा भाजपसोबत जाणे योग्य होते, असे आपण शिंदे यांनी पटवून दिले आणि त्यानंतर हे बंड झाले, असे शिवतारे यांनी म्हटले होते.


एकनाथ शिंदे आणि 40 शिवसेना आमदारांनी एवढे मोठे बंड केले याची उद्धव ठाकरे यांना माहिती कशी मिळाली नाही असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जातो. मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडाची आपल्याला कुणकुण लागली होती. तसे एसएमएसही येत होते, असा गोप्यास्पोट ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केला आहे. कोणत्याही परिस्थितीत उद्धव ठाकरे यांची साथ सोडायची नाही असा निर्धार आपण आणि शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी केला होता, असेही ओमराजे यांनी सांगितले. 


महाविकास आघाडीचे मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे उमेदवार विक्रम काळे यांच्या प्रचार सभेत खासदार ओमराजे यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाची कुणकुण लागली होती मग याची माहिती त्यांनी उद्धव ठाकरे यांना का दिली नाही, असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे.