गटारी अमावस्येच्या रात्री हातातून मोठी चुक झाली; भरतीची स्वप्न पाहणाऱ्या तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
पोलिसांनी कारवाई केल्यामुळे आता करिअर संपले या भितीने तरुणाने आत्महत्या केली आहे. सुसाईड नोटमध्ये तरुणाने नैराश्यातून हे पाऊल उचलल्याचे नमूद केले आहे.
Thane Crime News : ठाण्यात एक विचित्र घटना घडली आहे. भारतीय लष्कर आणि पोलीस मध्ये भरती होण्याची स्वप्न बघणाऱ्या तरुणाने निराश होऊन आत्महत्या केली आहे. मद्यपान करून ट्रिपल सीट जात आतांना पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली. यामुळेच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. या घटेनमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
काय घडलं नेमकं?
गटारी अमावस्या च्या रात्री मद्यपान करून मित्रांसोबत दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली होती. त्या कारवाईत अडकलेल्या मनीष उतेकर या तरुणाने नैराश्य आल्याने आपलं जीवन संपवण्याचा दुर्दैवी निर्णय घेत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. भारतीय लष्कर आणि पोलीस मध्ये भरती होण्याची स्वप्न बघणाऱ्या या तरुणाने ड्रिंक एन्ड ड्राइव्हची केस लागल्यामुळे आपलं करियर संपलं,आपलं पुढे काय होणार या नैराश्यातून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. त्याच्या मित्रांनी आणि नातेवाईकांनी याप्रकरणी वाहतुक पोलिसांवर आरोप करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत पोलीस ठाणे गाठले.
सुसाईड नोट लिहून आईला पाठवली
या प्रकरणी आत्महत्या करणाऱ्या मनीष उतेकर या तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून आपल्या आईला पाठवली होती. या सुसाईड नोट मध्ये मनीष ने काही वाहतूक पोलिसांची नाव लिहून त्यांच्यावर आरोपही केले होते. या सर्व आरोपांचा वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ.विनयकुमार राठोड यांनी इन्कार केला. वाहतूक पोलिसांनी नियमानुसारच कारवाई केलेली असून एक तर ट्रिपल सीट त्यात मद्यपान करणे हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. ज्या दुर्दैवी तरुणाने आत्महत्या केली त्याने तर अति प्रचंड प्रमाणात मद्यपान केलं होतं आणि तो तडजोड करण्याची भाषा करत होता. मात्र, पोलीसांनी कुठलीही तडजोड करण्यास नकार देत न्यायालयाने आखून दिलेला नियमानुसार कारवाई केली. दुर्दैवाने त्या तरुणाने आत्महत्या केली हे फार वाईट झालं असून ज्या तरुणांना लष्कर अथवा पोलिसांत भरती व्हायचं आहे त्यांनी आशा प्रकारे कायदे मोडून वागू नये असे आवाहन ही त्यांनी केले.
पोलीस भरतीतील पेपर फोडणा-या आरोपींची यादी जाहीर
2021 सालातील पोलीस भरतीतील पेपर फोडणा-या आरोपींची यादी पिंपरी चिंचवड पोलिसांकडून जारी करण्यात आली आहे. पेपर फुटीतील तब्बल 68 आरोपींची यादी तयार केली असून, आरोपींना पोलिसांनी दणका दिला आहे. यादीत नाव असलेल्यांना राज्यात इतर ठिकाणी कुठेही पोलीस भरतीमध्ये सहभागी होता येणार नाही असे जाहीर केले. या सर्व घोटाळ्याचा झी 24 तासने पर्दाफाश केला होता. त्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलीस भरतीत गैरप्रकार झाल्याची सूचना एमपीएससी समन्वय समितीने दिली. त्याचा तपास अत्यंत कसोशीने पिंपरी-चिंचवड पोलिसांनी करून आरोपींची नावं समोर आणली आहेत. जे कष्टकरी प्रामाणिक विद्यार्थांच्या नोकऱ्यांवर डल्ला मारत होते, ते पुढील कोणत्याही नोकर भरतीत दिसू नयेत त्यावर लक्ष ठेवावे अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केली आहे.