Crime Story : महाराष्ट्रातील (Maharashtra) ठाणे (Thane) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली. गर्लफ्रेंडवर वाईट नजर ठेवणाऱ्या हॉटेल मालक मित्राचीच एकाने हत्या केली. ही हत्या इतकी निर्घृण होती की आरोपीने मित्रावर तब्बल सात ते आठ वार केले. इतकंच नाही तर त्याचा प्रायव्हेट पार्टही कापला. हत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अवघ्या 12 तासात गुन्ह्याची उकल करत पोलिसांनी आरोपीला अटक (Accused Arrest) केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे नेमकी घटना?
आरोपीचं नाव अस्लम अंसारी असं आहे. पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार अस्लम आणि मृत शमीम उर्फ सलमान खान एकमेकांचे जिगरी मित्र होते. सलमान खानच्या चार ते पाच गर्लफ्रेंड होत्या. यानंतरही त्याची अस्लमच्या गर्लफ्रेंडवर वाईट नजर होती. ही गोष्ट अस्लमला कळली. ताने सलमानला याचा जाबही विचारला तसंच तिच्या मागे न लागण्याचं सांगितलं. पण यानंतरही सलमान ऐकला नाही. याच गोष्टीवरुन अस्लम आणि सलमान यांच्यात वाद झाला. वादाचा रुपांतर हाणामारीत झालं. संतापलेल्या अस्लमने अचानक खिशातला चाकू काढून सलमानवर वार केले. हल्ल्यात सलमान जागीच कोसळला. पण संतापलेल्या अस्लमने यानंतरही त्यावर हल्ला सुरुच ठेवला. 


12 तासात आरोपीला अटक
सलमानवर हल्ला करुन अस्लम घटनास्थळावरुन फरार झाला. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तात्काळ तपास करत आरोपील अस्लमला अवघ्या बारा तासात अटक केली. अस्लमला कोर्टात हजर केलं असता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.


याआधीही दिली होती धमकी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गर्लफ्रेंडवरुन अस्लम आणि सलमानमध्ये याआधीही काहीवेळा भांडणं झाली होती. अस्लमने त्याला त्याचा प्रायव्हेट पार्ट कापण्याची धमकीही दिली होती. घटनेच्या दिवशी याच इराद्याने अस्लम सलमानच्या हॉटेलमध्यो पोहोचला. रात्री हॉटेल बंद झाल्यानंतर त्याने सलमानशी वाद उकरुन काढला आणि चाकूने त्याची हत्या केली. हत्या केल्यानंतर त्याचा प्रायव्हेट पार्टही कापला.