मुंबई : मध्य रेल्वे (Central Railway) मार्गावरील विठ्ठलवाडी स्थानकात (vithalwadi station) थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या डेक्कन एक्स्प्रेससमोर (Deccan Express) एका व्यक्तीने आपल्या लहान मुलासह उडी मारुन आत्महत्या केली. या दुर्घटनेत वडिलांचा जागीच मृत्यू झाला तर सहा वर्षांचा चिमुरडा आश्चर्यकारकरित्या बचावला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बेस्टमध्ये (BEST) चालक असलेले प्रमोद आंधळे पत्नी आणि दोन मुलांसह उल्हासनगरच्या शांतिनगर परिसरात राहतात. बुधवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ते आपल्या सहा वर्षांच्या मुलाला घेऊन विठ्ठलवाडी स्थानकात पोहचले. विठ्ठलवाडी स्थानकात मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या डेक्कन एक्स्प्रेससमोर त्यांनी मुलासह त्यांनी अचानक उडी मारली.


अचानक घडलेल्या या घटनेने रेल्वे स्थानकावर एकच गदारोळ झाला. रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पण या दुर्घटनेत प्रमोद आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर सहा वर्षांचा मुलगा रेल्वे रुळाच्या बाहेर पडल्याने तो सुखरुप बचावला. रेल्वे पोलिसांनी तात्काळ त्या मुलाला बाहेर काढलं. 


प्रमोद आंधळे आपली पत्नी,  मुलगा आणि मुली सह राहत होते. प्रमोद बेस्टमध्ये चालक म्हणून नोकरी करत होते. कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी असताना प्रमोद यांनी इतका मोठा निर्णय का घेतला याचा पोलीस करत आहेत.