मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाण्यात आज काही वेळात सभा आहे, राज ठाकरे यांनी यापूर्वी ज्या मशीदीत अजान लाउडस्पीकरने वाजवली जात असेल, त्या समोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा  लाऊडस्पीकरने लावा, असं म्हटलं  होतं, यानंतर राज ठाकरे हे कट्टर हिंदुत्वाकडे झुकत असल्याची चर्चा सुरु झाली. तर राज ठाकरे यांची आज ठाण्यात सभा आहे, या सभेला एका हौशी कार्यकर्त्याने हनुमानाचं रुप घेतलं आणि सभेला येत होता, पोलिसांनी या हनुमानालाच ताब्यात घेतले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरे यांची ठाण्यात आज सभा होत आहे, यासभेला अनेक लांबून कार्यकर्ते येताना दिसत आहेत, यापूर्वीच राज ठाकरे मुंबईतून ठाण्याकडे आपल्या गाडीने रवाना झालेले आहेत.



राज ठाकरे यांचं सभास्थळ हे भगवामय दिसून आलं आहे. राज ठाकरे यांच्या या सभेला मनसेने उत्तर सभा म्हटलं, तर राज ठाकरे या सभेत कुणाला काय उत्तर देतात याची सर्वांनाच उत्सुकता लागून आहे.