ठाणे : ठाणे महानगर पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. राजू मुरुडकर यांना 5 लाख रुपये घेताना अटक करण्यात आलीय. गुरुवारी संध्याकाळी लाचलुचपत खात्याच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉ. राजू मुरुडकर हे ठाणे महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख असून त्यांनी एका कंपनीकडून 15 लाखाची मागणी केली होती. ती कंपनी ठाणे महानगरपालिकेला व्हेंटिलेटर पुरवणार होती. 



एकूण कंत्राट 1.5 कोटींचे होते. त्याचे दहा टक्के लाच म्हणून मुरूडकर यांनी मागितले होते. एका खाजगी हॉस्पिटलमध्ये ऐरोली येथे हा व्यवहार होणार होता. 


त्यापैकी ५ लाख रुपये घेताना ऐरोली येथून लाचलुचपत खात्याने सापळा लावून अटक केली.  लाचलुचपत विभागाने तिथे आधीच सापळा रचला होता.