Thane Metro Accident: ठाण्यातील तीन हात नाका परिसरात मेट्रोचं (Metro) काम सुरू असताना मोठा अपघात घडला आहे. 20 ते 30 फूट  उंचीवरुन पडून एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर, मनसेने या प्रकरणी इशारा दिला आहे. (Thane News Today)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाण्यात मेट्रोच्या कामाला गती आली असून कामे वेगात सुरू आहेत. यावेळी मेट्रोचे काम तीनहात जंक्शन येथे सुरू असताना असतानाच एक कामगार उंचीवरुन खाली कोसळला. गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा मृत्यू झाला आहे. कामगाराच्या मृत्यूनंतर मनसेकडून कारवाईची मागणी करण्यात आली आहे. जोपर्यंत कामगाराला न्याय मिळत नाही तोपर्यंत मेट्रो 4चे काम बंद पाडण्याचा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे. तसंच, आता पर्यंत 4 ते 5 जणांचा मृत्यू मेट्रोच्या कामामुळे झाला असल्याचा आरोप मनसेने केला आहे. 


नेमकं काय घडलं?


घटनास्थळी असलेल्या प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, मेट्रोचे काम करताना एक व्यक्ती खाली कोसळला. जो व्यक्ती जेव्हा खाली कोसळला तेव्हा त्याचे श्वास चालु होते. पण कोणच त्याला उचलण्यासाठी पुढे आले नाही. पोलीस आणि रुग्णवाहिका येईपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. त्या कामगाराचा जीव वाचला असता जर येथले सुपरवायजर किंवा संबंधित व्यक्ती आला असला तर जवळच खासगी रुग्णालय आहे. तिथे दाखल केले असते तर त्याचा जीव वाचला असता, अशी माहिती तिथे उपस्थित असलेल्या व्यक्तीने दिली आहे. 


मेट्रो 4च्या प्रकल्पावेळी घडणाऱ्या अपघातामुळं सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे. या घटनेमुळे मेट्रो काम सुरू असताना घेण्यात येणार सुरक्षा सक्षम आहे का? जर मोठी दुर्घटना घडली असती तर त्याला जबाबदार कोण असा सवाल ठाणेकर उपस्थित करत आहेत.


दरम्यान, ठाण्यातील तीन हात नाका मेट्रोचे काम सुरू असताना  जून महिन्यात विचित्र अपघात घडला होता. मेट्रोच्या पूलाखालून कार जात असताना लोखंडी सळई पडली. ही सळई कारच्या छतातून आरपार आत घुसली होती. मात्र, सुदैवाने कारचालकाला कोणतीही गंभीर दुखापत झाली नव्हती. 


महिलेचा मृत्यू


काही महिन्यांपूर्वीदेखील मेट्रो 4चे काम सुरू असताना अपघात घडला होता. मेट्रो प्रकल्पाच्या गर्डरची लोखंडी प्लेट खाली कोसळली होती. रस्ता ओलांडत असताना एका महिलेवर ही प्लेट कोसळली. लोखंडी प्लेट असल्याने व वजन जास्त असल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.