Kalwa Hospital Molestation Case: कोलकत्ता येथील महिला प्रशिक्षणार्थी महिलेवर बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळं देशभरातून संताप व्यक्त होत असतानाच महाराष्ट्रातदेखील असाच एक प्रकार घडला आहे. महाराष्ट्रातील रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी धक्कादायक घटना कळव्यात घडली आहे. कळव्यात एका अल्पवयीन गतीमंद मुलीचा विनयभंग रुग्णालयाच्या परिसरात करण्यात आला आहे. या घटनेने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.  (Kalwa Municipal Hospital) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कळवा रुग्णालय परिसरातील गार्डनमध्ये एका अल्पवयीन गतिमंद मुलीचा विनयभंगा करण्यात आला. विनयभंग केल्यानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आलं होतं. या प्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी सीसीटिव्ही व तांत्रिक माहितीच्या मदतीने आरोपीला अटक केली आहे. प्रदीप शेळके असं आरोपीचं नाव आहे.


कळवा रुग्णालय हे ठाण्याचे एकमेव सरकारी रुग्णालय आहे. शहापूर, मुरबाड येथून लोक या रुग्णालयात येतात. ज्या दिवशी हा प्रकार घडला तेव्हा कोलकात्ता प्रकरणाच्या निषेधार्थ डॉक्टर आंदोलनासाठी बसले होते. तेव्हा पीडीत तरुणीच्या एका नातेवाईकांना हा सगळा प्रकार पाहिला. तेव्हा त्यांनी लगेचच डॉक्टरांना हा सगळा प्रकार सांगितला. तेव्हा डॉक्टर आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी लगेचच आरोपीला ताब्यात घेतलं आणि त्याला चांगलाच चोप दिला आहे. त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात आरोपीला देण्यात आलं. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 


रुग्णालय आवारात सीसीटिव्ही नाही


कळवा  रुग्णालयामध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आरोपीला अटक झाली परंतु धक्कादायक माहिती झी मीडियाच्या हाती आली आहे. कळवा रुग्णालयात सीसीटिव्ही आहेत. मात्र कळवा रुग्णालयाच्या आवारात मात्र एकही सीसीटिव्ही नाही आणि याच आवारात हा प्रकार घडला आहे. कळवा पोलीस याबाबत कळवा रुग्णालय प्रशासनाला या ठिकाणी सीसीटिव्ही लावा, असे पत्र देणार आहेत. कळवा रुग्णालयात नातेवाईकांना बसण्यासाठी एक बाग बनवली आहे आणि या बागेतच हा प्रकार घडला आहे.