व्यापाऱ्याकडे अडकलेले १० कोटी असे मिळाले
किराणा मालाचं दुकान चालवणाऱ्या नारायण दास ठक्कर या व्यापाऱ्याच्या अमिशाला बळी पडत या सर्वांनी त्याच्याकडे गुंतवणूक केली होती.
ठाणे : ठाण्यातील फसवणूक झालेल्या 325 गुंतवणूक दारांना पोलिसांनी त्यांची रक्कम परत मिळवून दिली आहे. किराणा मालाचं दुकान चालवणाऱ्या नारायण दास ठक्कर या व्यापाऱ्याच्या अमिशाला बळी पडत या सर्वांनी त्याच्याकडे गुंतवणूक केली होती.
औषध पुरवठ्याच्या नावाखाली फसवणूक
आफ्रिकेत औषध पुरवठा करण्यासाठी कंपनी सुरु होणार आहे, त्यात पैसे गुंतवल्यास महिन्याला दोन टक्के व्याज मिळेल, असं आमिष त्यानं या गुंतवणूकदारांना दखवले आणि सगळ्यांकडून 10 कोटी रुपये जमवले. 1998-99मध्ये ही घटना घडली.
1998-99 पासून अडकले होते पैसे
या गुंतवणूकदारांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी नारायण दास ठक्करला अटक केली, मात्र तो जामिनावर सुटला. त्यानं ठेविदारांचे पैसे परत करण्यास नकार दिला. मात्रपोलिसांनी सातत्यानं याचा पाठपूरावा सुरुच ठेवला होता.