ठाणे रेल्वे स्थानकाचा विस्तार होणार, या ठिकाणी नवे स्थानक
मध्य रेल्वेवर प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. ठाणे विस्तारित रेल्वे स्थानकाचा मार्ग मोकळा झाला आहे.
ठाणे : मध्य रेल्वेवर प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. ठाणे विस्तारित रेल्वे स्थानकाचा मार्ग मोकळा झाला आहे. आरोग्य विभागाची जागा रेल्वे स्थानकासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मुलुंड आणि ठाणे दरम्यान नवे विस्तारित ठाणे रेल्वे स्टेशन होणार आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
आरोग्य विभागाची १५ एकर जागा रेल्वे स्टेशनसाठी ठाणे महापालिकेकडे होणार वर्ग होणार आहे. मागील २० वर्षांपासून हा विषय रखडला होता. जागेच्या बदल्यात आरोग्य विभागाला टीडीआर मिळणार आहे. दरम्यान, सध्या या जागेवर झोपड्यांचे अतिक्रमण असून ठाणे महापालिका या झोपड्यांचे पुनर्वसन करणार आहे.