सावधान...! ठाण्यात स्क्रिझोफेनिया रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ
राज्यभरातल्या दीडशे मानसोपचार तज्ज्ञांनी एकत्र येऊन `गाव तेथे मानसोपचार` हे अभियान सुरू केलंय
कपिल राऊत, झी २४ तास, ठाणे : ठाण्यात एका आजारानं थैमान घातलंय. ठाण्यात स्क्रिझोफेनियाच्या रुग्णांची संख्या प्रचंड वाढलीय. यात पुरुषांची संख्या जास्त आहे. नैराश्य, अश्लील चित्रफिती पाहणे आणि तुटत चाललेला संवाद ही स्क्रिझोफेनियाची मुख्य कारणं... स्किझोफ्रेनिया हा मानसिक आजार आणि मेदूचा विकार आहे... मेंदूमधल्या डोपामिन रसायनाच्या कमतरतेमुळे हा आजार होतो. जनुकांमधला बदल आणि गर्भवती महिलेला ताप किंवा ती महिला कुपोषित असल्यास बाळाला स्किझोफ्रेनिया आजार होण्याची शक्यता असते. या आजारामध्ये व्यक्तीचा वास्तवाशी संबंध तुटतो. या आजारातले फक्त २० टक्के रुग्ण बरे होतात, असं ठाणे मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनील बदोडे यांनी म्हटलंय.
स्क्रिझोफेनियासंदर्भात जनजागृती करण्यासाठी राज्यभरातल्या दीडशे मानसोपचार तज्ज्ञांनी एकत्र येऊन 'गाव तेथे मानसोपचार' हे अभियान सुरू केलंय.
तरुणांमध्ये स्क्रिझोफेनियाचं प्रमाण वढणं चिंतेचं आहे. संवादावर भर देऊन हा धोका कमी करणं शक्य आहे.