COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाणे : शहापूरचा शिवसेनेचा उप तालुका प्रमुख शैलेश निमसेंची हत्या त्याच्या पत्नीनंच करवून आणल्याचं उघड झालं आहे. शैलेशच्या पत्नीनंच शैलेश निमसेंच्या खुनाची सुपारी दिली होती. शैलेश निमसे यांच्या यांच्याकडून शारीरिक आणि मानसिक छळ होत होता, त्याला कंटाळून शैलेश निमसेंची पत्नीने हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. ठाणे ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलेश निमसे यांच्या पत्नीने प्रमोद नावाच्या व्यक्तीच्या मदतीने घरातच शैलेश निमसे यांचा गळा आवळून खून केला. यानंतर त्यांच्याच गाडीत हा मृतदेह गणेशपूरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत नेऊन अर्धवट जाळला, आणि ही राजकीय हत्या असल्याची दिशाभूल करण्याच प्रयत्न शैलेश निमसे यांच्या पत्नीने केला. मात्र पोलिसांच्या तपासामुळे या खुनाचा तात्काळ उलगडा झाला आहे.


सीसीटीव्हीच्या मदतीनं हा गुन्हा उघड होण्यास मदत झाली आहे. वेगाने ठाणे ग्रामीण पोलिसांनी या खुनाचा छडा लावण्यात यश आलं आहे. शैलेश निमसे यांना मारण्यासाठी त्याच्या पत्नीनं दीड लाखांची सुपारी दिली होती. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. तर तीन आरोपी अजून फरार आहेत, २० एप्रिल रोजी शैलेश यांचा मृतदेह ठाणे जिल्ह्यातल्या देवचौले गावात अर्धवट जळलेल्या अवस्थेत मिळाला होता.