चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, उल्हासनगर : ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी व्यापारी बाजारपेठ म्हणून उल्हासनगर शहराकडे पाहिलं जातं. मात्र गेल्या काही काळापासून ग्राहकांचा कल ऑनलाईन शॉपिंगकडे वाढल्यानं, त्याचा फटका उल्हासनगरच्या बाजारपेठेला बसला आहे. यावर उल्हानसगरमधल्या व्यापाऱ्यांनी जालीम उपाय शोधला आहे. 


बंपर सूट 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑनलाईन कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक बंपर सूट देत असल्यानं, ग्राहक ऑनलाईन खरेदीवर तुटून पडतात. त्यामुळे ऐन दिवाळी सणात उल्हानसनगरच्या बाजपरपेठेतील व्यवसायात ५० टक्के घट झाल्याचे व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.


ऑर्डर मागवून रद्द 


 या ऑनलाईन आक्रमणाला तोडीसतोड उत्तर देण्यासाठी, वस्तू मिळाल्यावर रक्कम देण्याच्या पर्याय वापरायचा निर्णय उल्हानसगरातल्या व्यापाऱ्यांनी घेतलाय. याद्वारे मालाची ऑर्डर मागवून ती नंतर रद्द करण्याचा निर्णय या व्यापाऱ्यांनी घेतलाय. मात्र स्वस्तात आणि विविध प्रकारच्या वस्तू घरपोच मिळत असल्यानं, नागरिकांचा कल मोठ्या प्रमाणात ऑनलाईन शॉपिंगकडे आहे.


दुकानदारांसाठी डोकेदुखी 


 उल्हासनगरमधल्या गजाजन मार्केटमधील तब्बल अडीच हजार दुकानदारांना, ऑनलाईन शॉपिंग सुविधेचा फटका बसला आहे. हेच चित्र इतरत्रही पाहायला मिळतंय. त्यामुळे ऑनलाईन शॉपिंगला भक्कम पर्याय शोधला गेला नाही, तर भविष्यात दुकानदारांसाठी ही मोठी डोकेदुखी ठरणार आहे.