मुंबई : माहुली किल्ला परिसरातील वजीर सुळक्यावरील चढाई.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पिंपरी चिंचवडच्या अग्निशमन दलात जवान म्हणून कार्यरत असणा-या अनिल वाघ यांनी अतिकठीण चढाई मोहीम फत्ते केली आहे. दुर्गम परिसर... उंचच उंच टेकड्या.... घनदाट जंगल... आणि त्यामधोमध असलेला हा 90 अंशातील सरळ सुळका... कुणाच्याही अंगावर काटा आणेल अशी ही जागा.  हा आहे ठाणे जिल्ह्यात शहापूरच्या माहुली किल्ला परिसरातला सुळका. ज्याला वजीर सुळका नावानं ओळखलं जातं. ही जागा पाहूनच जिथं सर्वसामान्यांच्या काळजाचा ठोका चुकतो तिथं या वजीर सुळक्याची चढाई करणं याची कल्पनाही करणं अशक्य. 


निसरडी गवताळ पाऊलवाट, 90 अंशातील सरळ उभी अतिकठीण चढाई.. सुळक्याच्या पूर्वेकडील दरीचा उतार जवळपास सहाशे फूट आणि पाण्याची प्रचंड कमतरता आहे त्यामुळे या सुळक्यावर ट्रेकिंग करायचं ठरवलं आणि इकडचा पाय तिकडे पडला तर थेट दरीच्या जबड्यातच विश्रांती. मात्र अशक्य ते शक्य करुन दाखवलंय पिंपरीच्या अनिल वाघ यांनी.  अग्निशमन दलात कार्यरत असणा-या वाघ यांनी आपले काही सहकारी आणि इंव्हिन्सेंबल टीम गुजरातच्या सदस्यांसह वजीर सुळक्यावर यशस्वी चढाई केलीय. 


प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत या गिर्यारोहकांनी वजीर सुळक्यावर तिरंगा फडकवला आणि राष्ट्रगीतसुद्धा गायले. अशक्यप्राय असं खडतर आव्हान पार करत अनिल वाघ आणि त्यांच्या सहका-यांनी दाखवलेल्या या धाडसाला सलाम केलं आबे,