वसंत पंचमीनिमित्त विठू माऊलीला हरी पोशाख
आज वसंत पंचमीनिमित्त भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसत आहे. आज देवी सरस्वतीची पूजा केली जाते. या दिवशी पंढरपुरातही भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. त्यामुळे इथेही मोठी सजावट करण्यात आलीये.
पंढरपूर : आज वसंत पंचमीनिमित्त भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसत आहे. आज देवी सरस्वतीची पूजा केली जाते. या दिवशी पंढरपुरातही भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. त्यामुळे इथेही मोठी सजावट करण्यात आलीये.
वसंत पंचमीनिमित्त विठू माऊलीला हरी पोशाख परिधान करण्यात आला आहे. या पोशाखातील त्यांचं हे रूप चांगलंच आकर्षक दिसत आहे.
काय आहे वसंत पंचमी?
वसंत पंचमीच्या दिवशी ज्ञानाची देवी सरस्वतीची पूजा केली जाते. हिंदू परंपरांमध्ये अशा मान्यता आहे की, वसंत पंचमीच्या दिवशी लहान मुलांना शिक्षण देण्याला सुरूवात केली जाते. तसेच या दिवशी सहा महिन्याच्या नवजात बालकांना पहिल्यांदाच अन्न खाऊ घातलं जातं.
काय आहे मान्यता?
पौराणिक मान्यतेनुसार असेही मानले जाते की, या दिवशी अनेक लोकांनी नवीन सुरूवात करावी. या दिवशी अनेक लोक गृह प्रवेश, वाहन खरेदी आणि नवीन व्यापार सुरू करतात. असे मानले जाते की, या दिवशी असे केल्यास लाभ होतो.