मुंबई :  आपल्या राज्यात, महाराष्ट्रात सामान्य जनतेला परिचित असणारे मोजकेच २० ते २५ पक्ष असतील. त्यातील भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, बहुजन समाज पार्टी, समाजवादी पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, स्वाभिमान असे काही मोजके आणि महत्वाचे पक्ष.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण या खेरीजही महाराष्ट्रात असे शेकडो छोटे मोठे पक्ष आहेत. या छोट्या मोठ्या पक्षांनी त्यांची रीतसर नोंदणी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. मोठया पक्षांसोबतच काही वेळा हे छोटे पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपली चमक दाखवून देतात. त्यावेळी त्यांच्या कामगिरीकडे लक्ष जाते.


नगर पंचायतीच्या निवडणूक झाल्या. या निवडणुकीतही अनेक छोट्या पक्षांनी चमकदार कामगिरी करत २८५ जागांवर आपले उमदेवार निवडून आणले. आताही आगामी काळात मोठ्या प्रमाणावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, हे लक्षात घेता राज्य निवडणूक आयोगाने या पक्षांना आपला अद्ययावत संपर्काचा तपशील आयोगाकडे देण्याचे आवाहन केले आहे.


राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेल्या राजकीय पक्षांनी आपल्या पक्षाचे अद्ययावत संपर्क पत्ता, दूरध्वनी, ई-मेल आयडी आणि विद्यमान कार्यकारणीतील सदस्यांचा तपशील राज्य निवडणूक आयोगास सादर करावा, असे आवाहन केले आहे.


हे राजकीय पक्ष किती असतील याचे आकडे पाहून तुम्ही थक्क व्हाल. कारण, राज्य निवडणूक आयोगाकडे निंदणी केलेले हे एकूण पक्ष आहेत ३०५. हे पक्ष कोणते, कुठे आहेत याची आकडेवारी राज्य निवडणूक आयोगाकडे उपलब्ध आहे हे विशेष.