घरफोड्या करून सरपंच होण्याचे स्वप्न पाहिले; निवडणुकही लढवली पण, शेवटी...
सरपंच पदाची निवडणुक लढवणारा उमेदवार घरफोडी करणारा आरोपी निघाला आहे. पोलिसांनी याला चांगलाच धडा शिकवला आहे.
Jalgaon Crime News : कानून के हात लंबे होते है... पोलिसांसमोर भल्याभल्याची बोबडी वळते. या प्रत्यक्षात अनुभव जळगावात आला आहे. घरफोड्या करून सरपंच होण्याचे स्वप्न पाहणारा पराभूत सरपंच पदाचा उमेदवार पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. या पराभूत उमेद्वाराची चांगलीच चर्चा रंगली आहे.
घरफोड्यांच्या पैशावर गाव पाटीलकीचा रुबाब दाखवणाऱ्या अट्टल चोरट्याचे बिंग पोलिसांनी फोडले आहे. गावात पुढारी म्हणून मिरवणाऱ्या या भामट्याला पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने 20 घरफोड्यांची कबुली दिली आहे. ग्रामपंचायतच्या निवडणुकीत सरपंच पदासाठी पैशांची केलेली उधळण त्याला चांगलीच महागात पडली आहे. प्रवीण पाटील असे आरोपीचे नाव आहे.
व्हाईट कॉलर चोरट्याचा पर्दाफाश
जळगाव जिल्ह्यातील बिलवाडी येथील प्रवीण पाटील या व्हाईट कॉलर चोरट्याचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. ग्रामपंचायतच्या निवडणुकीत पराभवानंतरही पाटीलकीचा रुबाब कायम ठेवणाऱ्या प्रवीण पाटलाबाबत पोलिसांना लागली कुणकुण लागली होती. संशयावरून पोलिसांनी पाळत ठेवत अट्टल चोरटा प्रवीण पाटील चे पितळ उघडे पाडले. चोरीच्या ऐवज मधून खरेदी केलेली कार आणि बाईक पोलिसांनी चोरट्याकडून जप्त केली आहे. कारने नातेवाईकांकडे जाऊन तो रेकी करायचा आणि रात्री घरफोडी करायचा.
गावबंदीचे बॅनर फाडल्याच्या निषेधार्थ करणार रस्ता रोको
येवला तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसापासून मातुलठान, कातरणी ,वडगाव, सायगाव, अंदरसुल या गावात मनोज जरांगे पाटील यांचा फोटो असलेले गाव बंदीचे जे फलक लावले होते ते फलक फाडण्यात आल्याने त्याच्या निषेधार्थ उद्या गुरुवार रोजी येवला तहसील कार्यालय समोर नगर मनमाड महामार्गावर सकल मराठा समाजाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.\
हिंगोली जिल्हा परिषदेच्या प्रगत कक्षाला आग, जुने रेकॉर्ड जळाले
हिंगोली जिल्हा परिषदेतील अभ्यागत कक्षाला दुपारच्या सुमारास मोठी आग लागली. या आगीत अभ्यागत कक्षात असलेलं साहित्य जळून खाक झाले. भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे कक्षातील सर्व कर्मचारी अधिकारी यांना जिल्हा परिषदेच्या बाहेर काढण्यात आले. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशामक दलाकडून प्रयत्न सुरू आहेत. मोठ्या प्रमाणात आग लागल्याने आगीचे लोळ पसरले आहेत, यामध्ये तेथे असलेले काही रेकॉर्ड ही जळाल्याची माहिती मिळत आहे.