रविंद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : सांगलीतील कोरोना क्वारंटाईन सेंटरमधून कोरोना पोझिटिव्ह दोन आरोपी पळून गेले होते. या दोन आरोपींना पुन्हा पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. राजू कोळी आणि रोहित जगदाळे अशी या आरोपींची नावे असून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि सांगली शहर पोलिसांनी आज या दोघाना अटक केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान पळून गेल्या नंतर या आरोपीनी सांगलीतून एक बुलेरो चार चाकी गाडी चोरली होती. आज राजू कोळी याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागच्या पोलिसांनी कराड मधून अटक केली तर आरोपी रोहित जगदाळे याला सांगली शहर पोलिसांनी सांगलीतून अटक केली आहे. 


सांगली शहर पोलीस ठाण्याकडील रेकॉर्डवरील आरोपी राजू कोळी आणि रोहित जगदाळे याना जबरी चोरीच्या गुन्ह्यात १९ सप्टेंबर रोजी अटक झाली होती. कारागृहात दाखल करत असताना त्यांची कोरोनाची चाचणी घेतली ती पॉझिटिव्ह आल्याने त्यांना या कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. २७ सप्टेंबर रोजी त्या ठिकाणाहून त्यांनी पळ काढला होता.



सांगलीतील कोरोना सेंटर मधून कोरोना पोझिटिव्ह असणारे दोन आरोपी पळून गेल्याने शहरात खळबळ माजली होती. आरोपी पळून जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाले होते.


या फरारी झालेल्या दोघा आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पाच पथके रवाना झाली होती. तर आरोपी पळून जाताना बंदोबस्तास असलेल्या गार्ड ड्युटी असलेल्या पोलिसांवर कारवाई करण्यात आली. या सर्वांची बदली पोलीस मुख्यालयात करण्यात आली आहे.


स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि सांगली शहर पोलिसांनी आरोपी राजू कोळी आणि रोहित जगदाळे यांना पुन्हा अटक केली आहे. पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे, सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर, पीएसआय प्रवीण शिंदे, बिरोबा नरळे, संतोष गळवे, शहराचे  विक्रम खोत आणि झाकीर काझी यांच्या पथकाने ही कारवाई करत आरोपीना जेरबंद केलं आहे.