Chhatrapati Shivaji Maharaj : तुळजाभवानी देवीचे पुरातन दागिने अखेर सापडले आहेत. देवीच्या खजिन्यात हे दागिने सापडले आहेत. या दागिन्यांवर छत्रपती शिवरायांचं नाव आहे. शिवाजी महाराजांशी संबंधित हा एकमेव पुरावा असल्याचं बोलंल जातं आहे.


का खास आहेत हे दागिने


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुळजाभवानीच्या अलंकारांमध्ये आठव्या शतकातील रोमन अलंकार आढळले आहेत. यामध्ये रोमन साम्राज्याच्या काळात बनवलेले चार हार आढळले आहेत.  यात सर्वोच्च कॅरेटचा हिरा आढळला आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव असलेला पहिला अलंकार आहे.  शिवकालीन जगदंबा लिहिलेला अलंकार सापडला आहे. हे दागिने जतन करण्याची मागणी केली जात आहे. 


तुळजाभवानी देवीचे मौल्यवान दागिने गायब 


तुळजापूरचं तुळजाभवानी मंदिर साडेतीन शक्तीपीठांपैकी एक. दरवर्षी लाखो भाविक तुळजाभवानीच्या दर्शनाला येतात आणि देवीची खणा-नारळाने ओटी भरतात. दान स्वरूपात देवीच्या चरणी सोन्या-चांदीचे, हिरोजडीत दागिने अर्पण केले जातात. 23 जूनला देवीच्या दागिन्यांची मोजदाद पूर्ण झाली. मात्र अनेक मौल्यवान दागिने गायब झाल्याचं निदर्शनास आलं. मोजदाद करणा-या समितीनं तसा अहवाल जिल्हाधिका-यांना दिला त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी दागिन्यांची पुन्हा एकदा मोजदाद करण्याचे आदेश दिले होते. 


दागिन्यांचा काळाबाजार 


माहितीनुसार गेल्या 13 वर्षात भाविकांनी देवीच्या चरणी 204 किलो सोनं आणि 861 किलो चांदी अर्पण केली. हे दागिने वितळवण्यापूर्वी जिल्हाधिका-यांनी समिती स्थापन करून दागिन्यांची मोजदाद केली. मात्र यातले बरेचसे दागिने गहाळ झाल्याचं दिसून आलं. याप्रकरणी याआधी पाच जणांवर ठपका ठेवण्यात आला होता. मात्र त्यातील चौघांना निर्दोष सोडण्यात आलं, आता पुन्हा एकदा दागिन्यांचा काळाबाजार समोर आलाय. 


देवीला अर्पण करण्यात आलेल्या दागिन्यांपैकी 50 टक्के दागिनेच शुद्ध 


देवीला अर्पण करण्यात आलेल्या दागिन्यांपैकी 50 टक्के दागिनेच शुद्ध असल्याचं समोर आलंय. याचाच अर्थ अनेक भाविकांनी नकली दागिने अर्पण केलेत. भक्तांनी आईच्या चरणी 207 किलो सोनं आणि 2570 किलो चांदी अर्पण केली. एव्हढचं नाही तर 354 हिरे देखील अर्पण केले आहेत. मात्र यातील 111 किलो सोनंच शुद्ध असल्याचं उघड झालंय. त्यामुळे संस्थाननं दान स्वरूपात आलेल्या सोन्याची शुद्धता तपासण्याचा निर्णय घेतलाय.