कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात करुणा शर्मा - मुंडे यांनीही उडी घेतली आहे. कोल्हापूरची करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन आज उमेदवारी अर्ज भरणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्री अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर करुणा शर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, १३ कोटी जनतेचा आवाज म्हणून विधानसभेत जाण्याची माझी इच्छा आहे. महिलांची सुरक्षा आणि सक्षमीकरणावर कामगिरी करणार आहे. कोल्हापुरात घराणेशाही असल्यामुळे येथील विकास थांबला आहे. त्यामुळे हे घराणेशाहीचे राजकारण संपविण्यासाठी आणि कोल्हापूरचा विकास करण्यासाठीच निवडणुकीच्या रिंगणात उतरत असल्याचे त्या म्हणाल्या.


उमेदवारी अर्ज भरण्यासाठी धनंजय मुंडे यांना तांत्रिक अडचणी येतील. मी त्यांची पत्नी आहेत. तसे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. कागदपत्रे आहेत. कायदेशीर पुरावे आहेत. धनंजय मुंडे यांनी स्वतःची सहा मुले लपवली. अनेक बायका लपवल्या आहेत. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी मला नाही तर त्यांना तांत्रिक अडचणी येतील. 


२५ वर्षांची प्रेमकहाणी मराठी पडद्यावर


करुणा मुंडे शर्मा आणि धनंजय मुंडे यांची २५ वर्षाची प्रेम कहाणी आहे. ही प्रेम कहाणी मराठी पडद्यावर लवकरच येणार आहे. मराठी सिनेमाचे काम सुरु आहे. यात २५ वर्षात जे जे काही घडले ते सर्व पडद्यावर येणार आहे. यात लपवण्यासारखं काही नाही, असेही करुणा शर्मा यांनी सांगितले.