वसई : वसईत एकाला ऑनलाईन बाईक विकणं महागात पडलं आहे. बाईकच्या टेस्ट राईडासाठी आलेल्या चोरट्यानं लाखांची बाईक लंपास केली आहे. एँसील्टन परेरा असं तक्रारदाराचं नाव आहे. एँसील्टननं केटीएम 390 बाईकची जाहीरात फेसबुकवर टाकली होती. या जाहीरातीवरून एका भामट्यानं त्याला संपर्क साधला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टेस्ट राईडसाठी हा भामटा परेराची बाईक घेऊन गेला. मात्र बराच वेळ तो न परतल्यामुळे परेराला संशय आला. अखेर बाईक चोरीला गेल्याचं लक्षात येता त्यानं पोलिसांत तक्रार नोंदवली. चोरीची घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.


ऑनलाईन खरेदी विक्री ही सध्याची गरज झाली असली तर यातून आता फसवणुकीचे अनेक प्रकार देखील होताना दिसत आहेत. ऑनलाईन खरेदीविक्री सोपी असल्याने अनेकदा याचा वापर केला जातो. पण याच माध्यमातून अनोखळी लोकांकडून फसवणूक होत असते. असाच आणखी एक धक्कादायक प्रकार वसईतून समोर आला.


ऑनलाईन व्यवहार करताना अशा भामट्यांकडून सावध राहण्याची दरज आहे. त्यामुळे कोणतेही व्यवहार अतिशय काळजीपूर्वक करणं आवश्यक आहे. अन्यथा कोणाचीही फसवणूक होऊ शकते.