नाशिक : शिवसेनेच्या ताब्यात असणाऱ्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर भाजपने कब्जा मिळविला आहे. बँकेच्या अध्यक्षपदी केदार आहेर यांची बिनविरोध निवड झालीय.


प्रशासकाची नेमणूक करण्याची चर्चा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बँकेतील गैर व्यवहारांच्या पार्शभूमीवर प्रशासकाची नेमणूक करण्याची चर्चा असल्याने अध्यक्षपद किती काळ उपभोगता येईल त्या विषयी प्रश्नचिन्ह आहे.नाशिक जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेद्र दराडे यांना आगामी विधानपरिषद निवडणुकीचे वेध लागल्याने त्यांनी पदाचा राजीनामा दिल्याने अध्यक्षपदाच्या  निवडणुकीसाठी मतदान घेण्यात आले. 


शिवसेना-भाजपमध्ये रस्सीखेच


शिवसेनच्या ताब्यातील जिल्हा बँक भाजपाच्या ताब्यात जाणार हे नक्की असल्याने पक्षात सुरुवातीपासूनच रस्सीखेच सुरु होती. त्यात माजी आमदार माणिकराव कोकाटे आणि परवेज कोकणी या दोघांची नावे चर्चेत होती. दोघांनी जोरदार लॉबिंग केले होतें मात्र ऐन वेळी पक्षाकडून आमदार राहुल आहेर यांचे बंधू केदार आहेर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. बिनविरोध निवडणूक प्रक्रिया पार पडली. 


नोकर भरती प्रकियेत गैरव्यवहार ?


जिल्हा बॅंकेच्या कारभारावर कायमच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेत, सीसीटीव्ही खरेदी प्रक्रिया, नोट बंदीच्या काळात रिझर्व्ह बँकेने लावलेले निर्बंध या कारणामुळे बँक नेहमीच चर्चेत राहिली. त्यातच मध्यंतरी झालेल्या नोकर भरती प्रकियेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजपच्याच संचालकांनी करत पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे हे पद औटघटकेच राहत का याविषयी शंका उपस्थित केली जात होती. मात्र  सध्यातरी नवनिर्वाचित अध्यक्ष आणि जिल्हा जिल्हा उपनिबंध बोलयला तयार नाहीत.


शिवसेनेचा इशारा


शिवसेनेच्या ताब्यात बँक असताना सरकारकडून दुजाभाव केला जात होता. कारभारावर  आरोप करून चौकशीची मागणी केली जातेय तिच भूमिका सरकार आता घेणार का, याकडे लक्ष ठेवणार असल्याचा इशारा शिवसेना देतेय. अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली असली तरी आर्थिक अडचणीत सापडलेल्या बँकेला रुळावर आणण्याचे शिवधनुष्य नव्या अध्यक्षांना पेलावा लागणार आहे.