रत्नागिरी : मच्छीमारीसाठी गेलेल्या छोट्या बोटीला म्हणजेच बलावाला पूर्णगड येथील खाडी समुद्रात जलसमाधी मिळाली. बोटीमधील दोघांचा बुडून मृत्यू झालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वादळामुळे समुद्र खवळलेला होता. एक अजस्त्र लाट या बोटीवर आदळली आणि काही क्षणात समुद्रात बोट पलटली. या बोटीवर जैनुद्दीन पठाण, अब्बास पठाण, हसन पठाण आणि तवक्कल वांगी हे खलाशी होती. बेपत्ता खलाशांचा रात्रीपासूनच शोध सुरू आहे.


दरम्यान, जैनुद्दीन आणि हसन या दोघा सख्या भावांचे मृतदेह शोधण्यात स्थानिकांना यश आले. मात्र इतर दोघांचे मृतदेह अजुनही सापडलेले नाहीत. पोलिसांशिवाय दुसऱ्या कुठल्याही सरकारी यंत्रणेकडून इथे मदत मिळालेली नाही, त्यामुळं स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.