महाराष्ट्राला लस देण्यात केंद्राचा आखडता हात, प्रत्यक्षात मिळाले केवळ इतके डोस
राज्याला 15 लाख 72 हजार डोस मिळणं अपेक्षित होतं.
मुंबई : कोरोनाचा देशातील सर्वाधिक केसेस महाराष्ट्रात असताना लस वितरणात मात्र केंद्र सरकारनं आखडता हात घेतल्याचं दिसतंय. राज्याला 15 लाख 72 हजार डोस मिळणं अपेक्षित होतं. पण प्रत्यक्षात राज्याला केवळ 9 लाख 63 हजार लसींचा डोस मिळालाय.
5 लाख 89 हजार डोस केंद्राकडून कमी मिळाले आहेत. त्यामुळे 2 लाख 94 हजार 500 कोरोनायोद्ध्यांना लसीची वाट पाहावी लागणार
कोविड 19 आजारावरील सीरम इन्स्टिट्यूटच्या 'कोविशील्ड' या लसीचा पहिला साठा मुंबईमध्ये दाखल झालाय.बीएमसीच्या विशेष वाहनाने ही लस पुण्याहून मुंबईत आणण्यात आली. मनपाच्या परळ येथील F- दक्षिण विभाग कार्यालयात हा साठा पोहोचलाय.
पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट कडून सुमारे 1 लाख 39 हजार 500 डोस बीएमसीला मिळालेत. F- दक्षिण विभाग कार्यालयातून मुंबईत ठिकठिकाणी निर्देशित लसीकरण केंद्रांमध्ये ही लस पोहोचवण्यात येईल. त्यामुळे मुंबईतही 16 जानेवारीला लसीकरण शक्य आहे. मुंबईतील परेल इथल्या कार्यालयात सध्या या लस ठेवण्यात आल्या आहेत.
(Corona vaccine) पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूटमधून (Serum Institute) आज देशभरात कोरोनाची लस रवाना झाली. या लसीसाठी सीरम इन्स्टिट्यूटमधल्या कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस मेहनत घेतली. पुढच्या महिन्या दोन महिन्यांत तुमच्या घरात कोरोनाची लस घेण्याची तयारी सुरू होईल. या कोरोनाच्या लसीसाठी तुम्हाला किती पैसे राखून ठेवायचे आहेत.